जिस समाज में हत्यारे हिरो होते हैं…; अतीक-अशरफ यांच्या हत्येनंतर औवेसी यांनी ट्विट केले…

| Updated on: Apr 16, 2023 | 1:27 AM

अहमद यांचा मुलगा असद याचाही दोनच दिवसांपूर्वी झाशी येथे एन्काऊंटर करण्यात आला आहे. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडलेली गोळीबाराची ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे, त्याचवेळी या दोघांसमोर पत्रकार आणि काही कर्मचारीही त्यांच्यासोबत होते.

जिस समाज में हत्यारे हिरो होते हैं...;  अतीक-अशरफ यांच्या हत्येनंतर औवेसी यांनी ट्विट केले...
Follow us on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये पोलीस कोठडीत असतानाच अतिक आणि अशरफ अहमद यांची हत्या झाली. त्या हत्येनंतर आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर तोफ डागली आहे. या हत्याकांडाबद्दल खासदार ओवेसी म्हणाले की, अतिक आणि त्याचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात होता. मात्र या हत्येचा आनंद साजरा करणारेही या घटनेला जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. अतिक अहमद आणि अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना त्यांची हत्या करण्यात आली आहे. यावेळी ते माध्यमांसमोर बोलत असतानाच त्यांची हत्या करण्यात आल्याने ओवेसी यांनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

या हत्येप्रकरणी असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट केले की, ‘अतीक़ और उनके भाई पुलिस की हिरासत में थे। उन पर हथकड़ियाँ लगी हुई थीं। JSR के नारे भी लगाये गये। दोनों की हत्या योगी के क़ानून व्यवस्था की नाकामी है।

एनकाउंटर राज का जश्न मनाने वाले भी इस हत्या के ज़िम्मेदार हैं। त्याच बरोबर त्यांनी म्हटले आहे की, ज्या समाजात खुनी हिरो वाटतात, त्या समाजात न्यायालय आणि न्याय व्यवस्थेचा उपयोग काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 

वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असतानाच अतीक अहमद आणि अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर आता एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे की, या घटनेप्रकरणी आता तिघांना अटक करण्यात आली आहे.

तर अहमद यांचा मुलगा असद याचाही दोनच दिवसांपूर्वी झाशी येथे एन्काऊंटर करण्यात आला आहे. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडलेली गोळीबाराची ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे, त्याचवेळी या दोघांसमोर पत्रकार आणि काही कर्मचारीही त्यांच्यासोबत होते. तरीही हत्या झाल्याने आता अनेक सवाल उपस्थित केले जाते आहेत.