असदुद्दीन ओवेसी यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला, म्हणाले…

एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी कोरोनाची लस (Corona Vaccine) घेतली आहे. Asaduddin Owaisi took First Dose of Corona Vaccine

असदुद्दीन ओवेसी यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला, म्हणाले...
Asduddhin Owaisi took First Dose of Corona Vaccine
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 1:09 PM

हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष, लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी कोरोनाची लस (Corona Vaccine) घेतली आहे. कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्याचं असदुद्दीन ओवेसी यांनी इन्स्टाग्राम पोस्टमधून सांगितलं आहे. (Asaduddin Owaisi took First Dose of Corona Vaccine)

ओवैसी यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय, “मी आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोना लस फक्त तुम्हालाच सुरक्षित ठेवते असं नाही तर आपल्या जवळच्या व्यक्तींचा धोका देखील कमी करते किंबहुना त्यांनाही सुरक्षित ठेवते. मी विनंती करतो की जे पात्र असतील तर त्यांनीही कोरोना लस घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.”

ओवेसी यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये हॉस्पिटलमधील नर्स ओवेसी यांना कोरोना लस देताना दिसून येत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लस घेतावेळी ओवेसी यांच्या चेहऱ्यावर मास्क नाहीय.

पंतप्रधान मोदी यांना कोरोना लस

दरम्यान याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मार्चला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस घेतली होती. पंतप्रधान मोदी यांनी भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ (Covaxine ) या स्वदेशी लशीला प्राधान्य दिले.

‘कोव्हॅक्सिन’ ही लस हैदराबादस्थित भारत बायोटेक या कंपनीने विकसित केली आहे. जगातील आघाडीच्या कंपन्यांनी कोरोना लस आणल्यानंतर काही दिवसांतच कोव्हॅक्सिन लस बाजारपेठेत आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतानेही आपण लस विकसित करण्यास समर्थ असल्याचे दाखवून दिले होते.

उद्धव ठाकरेंनी घेतली कोरोना लस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (11 मार्च) कोरोनाची लस घेतली. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात त्यांनी कोवँक्सिन या लसीचा पहिला डोस घेतला. देशभरात गेल्या 1 मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी कोरोना लस घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींनी कोरोनाची लस घेतली. यांनीही जे. जे. रुग्णालयात लस घेतली. तसेच, उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही यावेळी कोरोनाची लस घेतली. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत कोरोना लस घेतली.

शरद पवारांना कोरोना लस

तसेच 1 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कोरोना लसीकरणे केले होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हिशिल्ड लस टोचण्यात आली होती. शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले होते.

(Asaduddin Owaisi took First Dose of Corona Vaccine)

हे ही वाचा :

COVID-19 Vaccine | पंतप्रधान मोदी यांच्या आईने घेतली कोरोना लस, मोदी म्हणतात…

CM Uddhav Thackeray Covid19 Vaccine | मुख्यमंत्र्यांसोबत सासूबाईही जेजेत, ठाकरे कुटुंबातून कोणी-कोणी लस घेतली?

देशी की परदेशी,पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमकी कोणती लस घेतली?

CM Uddhav Thackeray Covid19 Vaccination | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेतली कोरोनाची लस

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.