Asaram Bapu टांगेवाला, कथावाचक ते रेप आणि जन्मठेप | देशात 400 आश्रम, 2300 कोटींची संपत्ती, कशी जमा केली एवढी मोठी माया ?
Asaram Bapu bio Property and Court Cases : देशात आसाराम बापूला कोणी ओळखत नसेल असं वाटतं नाही. कारण देशभर भक्ताचं इतकं मोठं झाळ विनलं गेलं की, प्रत्येक राज्यात त्याचे घरोघरी भक्त तयार झाले. एका जमान्यात त्यांच्या दरबारात मोठे-मोठे नेते हजेरी लावत असतं. त्या आसाराम बापूने एका जमान्यात अवैद्य दारुची स्मगलिंग सुध्दा केली होती.
मुंबई : काल आसाराम बापूला (Asaram Bapu) शिक्षा जाहीर झाली, तेव्हापासून आसाराम बापू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अहमदाबादमधील कोर्टाने (ahmadabad court) आसारामला जन्मठेप सुनावली. एकवेळ पैशाच्या जीवावर लोकांचं मनोरंजन करणारा आसाराम जेलमधून बाहेर येण्यासाठी मोठी धडपड करीत होता. आसारामचं शिक्षण चौथी पर्यंत झालं आहे. धर्मगुरू असल्याचे भासवून आसारामने एवढी संपत्ती (Asaram Bapu bio Property)कमवली की प्राप्तिकर विभागालाही घाम फुटला होता. ज्यावेळी 2016 आसाराम बापूच्या संपत्तीची चौकशी झाली होती, त्यावेळी 2300 करोड रुपयांची संपत्ती होती. 400 आश्रम, त्याचबरोबर आसारामचे लाखो अनुयायी आणि त्यांच्या नावाने चालणारे अनेक ब्रॅंन्ड, आसारामने हे सगळं कसं केलं वाचा.
आसाराम बापूचा जन्म पाकिस्तानमधील
आसाराम बापूचा जन्म पाकिस्तानमधील सिंध प्रांतात 1941 मध्ये एका सामान्य घरात झाला होता. त्यांचं लहानपणी नाव असुमल हरपलानी होतं. ज्यावेळी देशाची फाळणी झाली, त्यावेळी आसाराम त्यांच्या कुटुंबियासोबत गुजरात राज्यात आला. पाकिस्तानमधून भारतात आल्यानंतर आसारामने टांगा चालवायला सुरुवात केली. त्याचबरोबर चार मित्रांच्यासोबतीनं दारुची स्मगलिंग सुध्दा केली. त्यानंतर सायकलच्या दुकानात काम केलं, ज्यावेळी आसाराम बापू चहा विकायला लागला. त्यावेळी त्याने दाडी वाढवली.
अहमदाबादमध्ये पहिला आश्रम
त्यावेळी असुमल हरपलानीने तिथल्या संत लीला शाह बाबा यांच्या आश्रमात जायला सुरुवात केली. त्यावेळी असुमल याने त्यांचा शिष्य असल्याचं घोषित करुन आपलं नाव आसाराम बापू करुन घेतलं. त्यानंतर आसारामने आपल्या आश्रमात लोकांना फसवायला सुरुवात केली. आसारामने आपला पहिला आश्रम अहमदाबादमधील मोटेरा या ठिकाणी तयार केला. लोकांनी अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत इतर लोकांमध्ये प्रचार केला आणि त्यामुळे आरारामच्या भक्तांमध्ये प्रचंड वाढ झाली.
भक्तांना फसवून जमिनी हडपल्या
पहिला आश्रम तयार झाल्यानंतर आसाराम बापूंनी आपला नेटवर्क देशात उभा करायला सुरुवात केली. काही वर्षांनी देशात 400 पेक्षा अधिक आश्रम तयार केले. सगळ्या आश्रमांना मिळालेली जमीन ही आसारामने भक्तांना फसवून घेतली आहे.
भरमसाठ फी आकारायचा
आसाराम ज्या ठिकाणी जात होता, तिथं गेल्यानंतर वेगवेगळ्या नव्या चमत्कारिक गोष्टी दाखवत होता. विशेष म्हणजे हे सगळं घडवून आणण्याच्या नावाखाली तो आयोजकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेत होता. त्याचबरोबर आश्रम चालवण्याच्या नावाखाली दर महिन्याला अनुयायांकडून नियमितपणे देणगी घेतली जात होती. ज्यावेळी एखादा मोठा सण आसायचा त्यावेळी आसाराम बापूची कमाई मोठ्या प्रमाणात असायची. मिळालेली सगळी कमाई ट्रस्टच्या नावावर जमा व्हायची.
आसारामने स्वत:च्या नावाने अनेक उत्पादन कंपन्या सुरु केल्या होत्या. आसारामचे अनुयायी त्या वस्तू मोठ्या उत्साहाने खरेदी करीत होते. आसारामकडे हळूहळू त्याच्याकडे भरपूर पैसा जमा होऊ लागला. त्यामुळे आसारामने हा सगळा पैसा परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवला, त्यामुळे त्याला मोठा नफा झाला. आयकर विभागाने ज्यावेळी या सगळ्याची चौकशी केली, त्यावेळी आसारामने केलेली सगळी काळी कृत्ये उजेडात आली. ज्याची कोणाला अपेक्षाही नव्हती. शेवटी त्याला जेलमध्ये जावं लागलं.