आधी नोटीस दिली नंतर उत्तरं मागवली; कारवाई तर होणारच…
सोनिया गांधी यांनी दोन्ही निरीक्षकांना लेखी अहवाल सादर करण्यास सांगितले असून दोन्ही नेत्यांनी मंगळवारी सायंकाळी हा अहवाल काँग्रेस अध्यक्षांना सादर केला जाणार आहे.
नवी दिल्लीः काँग्रेसच्या राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, पक्ष निरीक्षकांनी मंगळवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांच्या गटातील तीन नेत्यांवर शिस्तभंगाची (Discipline) कारवाई केली आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने पक्षाचे विधानसभेतील मुख्य व्हीप महेश जोशी, कॅबिनेट मंत्री शांती धारिवाल आणि आमदार धर्मेंद्र राठोड यांना नोटीस देऊन त्यांच्याकडून उत्तरं मागवण्यात आली आहेत. तुमच्यावरील आरोपांची 10 दिवसांत उत्तरे द्या, असंही बजावण्यात आले आहे.
आपण संसदीय कामकाज मंत्री असताना पक्षाच्या अधिकृत कार्यपद्धतीनुसार बोलावलेल्या बैठकीत आला नाही, मात्र वेगळी बैठकही तुम्ही घेतली. त्यामुळे तुमच्यावर अनुशासनाचा भंग केला असल्याचा ठपका ठेवत स्पष्टीकरण मागवण्यात येत आहे.
काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने राठोड यांना दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, तुम्ही पक्षाच्या अधिकृत विधीमंडळ पक्षाची बैठक सुरु असतानाही समांतर बैठक बोलवण्यात आली.
ही अनुशासनात्मक गोष्ट असल्याने तुमच्यावर कारवाई का करू नये असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. या घटनेचे10 दिवसांत उत्तर देण्याची सुचनाही करण्यात आली आहे.
शिस्तपालन समितीने महेश जोशी यांना दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, तुम्ही मुख्य व्हीप असताना तुम्ही सर्व आमदारांना अधिकृत बैठकीसाठी बोलावले होते.
तरीही आमदारांच्या समांतर सभेत तुम्ही सहभाग घेतला. त्यामुळे तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये असाही सवाल आमदारांना विचारण्यात आला आहे.
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची सोमवारी भेट घेतली. त्याबरोबरच मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन, के.सी. वेणुगोपाल आणि कमलनाथ या दोन्ही निरीक्षकांसह पक्षाच्या अनेक नेत्यांनीही त्यांची भेट घेतली होती.
सोनिया गांधी यांनी दोन्ही निरीक्षकांना लेखी अहवाल सादर करण्यास सांगितले असून दोन्ही नेत्यांनी मंगळवारी सायंकाळी हा अहवाल काँग्रेस अध्यक्षांना सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.