सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास नाही का? CWC बैठकीत अशोक गेहलोत आक्रमक

CWC बैठकीत काँग्रेस अंतर्गत निवडणुकीची मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेसमधील बंडाची भाषा करणाऱ्या नेत्यांवर चांगलेच भडकले.

सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास नाही का? CWC बैठकीत अशोक गेहलोत आक्रमक
अशोक गेहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 3:28 PM

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गृहकलहाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेस वर्किंग कमिटी अर्थात CWCची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस अंतर्गत निवडणुकीची मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेसमधील बंडाची भाषा करणाऱ्या नेत्यांवर चांगलेच भडकले आहेत. काँग्रेस अंतर्गत निवडणुकीची इतकी घाई का? नेतेमंडळींना आता सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नाही का? असा सवाल गेहलोत यांनी केलाय.(Ashok Gehlot’s question on the issue of inter-party elections in the Congress)

CWC बैठकीत अशोक गेहलोत यांनी जवळपास 15 मिनिटे आपलं म्हणणं मांडलं. सध्या देशात शेतकरी आंदोलन, महागाई, अर्थव्यवस्था अशा अनेक समस्या उभ्या आहेत. अशावेळी या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. संघटनात्मक निवडणुका नंतरही घेतल्या जाऊ शकतात. तातडीने निवडणूक घेण्याची मागणी करणाऱ्यांवर गेहलोत यांनी जोरदार निशाणा साधला. तुम्हाला सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर आता विश्वास उरला नाही का? असा प्रश्न गेहलोत यांनी केला आहे.

यापूर्वी पक्षांतर्गत निवडणुकीच्या मागणीसाठी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. पत्र लिहिणाऱ्यांपैकी असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी आजही पक्षांतर्गत निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला. त्याला अशोक गेहलोत यांनी उत्तर दिलं.

मे महिन्यात काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका?

काँग्रेस मे महिन्यात पक्षांतर्गत निवडणूक करु शकते, अशी शक्यता CWC बैठकीतून पुढे आली आहे. म्हणजे पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षांतर्गत निवडणुका करु शकतं.

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत शेतकरी आंदोलन, लसीकरण, चॅट विवाद याबाबत चौकशी करण्यासंबंधीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर लवकरच पक्षांतर्गत निवडणूक घेण्याचा मुद्दाही चर्चिला गेला. काँग्रेस जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरु ठेवण्याबाबतही शुक्रवारच्या बैठकीत निश्चिती करण्यात आली.

राष्ट्रीय मुद्द्यांवर फोकस गरजेचा

अशोक गेहलोत यांनी देशातील अनेक ज्वलनशील मुद्द्यांचा बैठकीत उल्लेख केला. लसीचा दर निश्चित केला जात आहे पण गरीब जनता लस कशी घेणार? तेलाच्या किमती वाढत आहेत. शेतकरी आंदोलनात मरत आहे. अशावेळी केंद्र सरकार काहीच करताना दिसत नाही. अशावेळ राष्ट्रीय मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं अशल्याचं मत गेहलोत यांनी व्यक्त केलं आहे.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादाचं सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश; सोनिया गांधींचा अर्णव गोस्वामींवर हल्ला

सुशीलकुमार शिंदे, मीराकुमारही काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत; मेमध्ये होणार निवडणूक?

तुम्ही काँग्रेसच्या कॅलेंडर वुमन पाहिल्यात?; राहूल नाही, प्रियांका गांधी घराघरात!

Ashok Gehlot’s question on the issue of inter-party elections in the Congress

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.