तुमचा चेहरा गांधी, पटेल यांच्यासारखा दिसला पाहिजे, सद्दाम हुसेनसारखा नको, राहुल गांधींवर या नेत्याचा निशाणा…

राहुल गांधी यांची एक सवय आहे, म्हणजे गुवाहाटीमध्ये क्रिकेट सामना असेल तर ते गुजरातमध्ये असतील.

तुमचा चेहरा गांधी, पटेल यांच्यासारखा दिसला पाहिजे, सद्दाम हुसेनसारखा नको, राहुल गांधींवर या नेत्याचा निशाणा...
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 8:29 PM

अहमदाबादः काँग्रेसची भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघाली आहे. राज्यातील 15 विधानसभा आणि 6 लोकसभा मतदार संघातून ही यात्रा आता निघून पुढे आली आहे. 7 नोव्हेंबरला भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येऊन पोहचली आहे. महाराष्ट्रातील आज ही यात्रा आली असता, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांच्या निशाणा साधला आहे, त्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, राहुलजी आपला चेहरा हा असा पाहिजे की, त्यामध्ये महात्मा गांधी, सरदार पटेल दिसले पाहिजे, पण तुमचा चेहरा हा सद्दाम हुसेनसारखा कधीच दिसता कामा नये असा टोलाही त्यांनी राहुल गांधींना लगावला आहे.

हिमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ते गुजरात निवडणुका असतानाही ते आले नाहीत त्यामुळेही त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

ते म्हणाले की, राहुल गांधी यांची एक सवय आहे, म्हणजे गुवाहाटीमध्ये क्रिकेट सामना असेल तर ते गुजरातमध्ये असतील.

गुजरातमध्येही ते सामना खेळण्यासाठी बॅट आणि सगळं साहित्य घेऊन तयार राहतील पण सामना खेळायला ते मैदानात उतरणार नाहीत अशी जोरदार टीका त्यांच्यावर केली आहे.

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर टीका केली त्यावरही मुख्यमंत्री बिस्वा यांनी जोरदार निशाणा साधला. सावरकर यांच्यावर टीका केल्याप्रकरणी ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी इतिहासाचे ज्ञान खूप कमी आहे.

कदाचित असंही झालं असेल की, कोणीतरी त्यांच्यासाठी इतिहास वाचला असेल आणि तोच इतिहास यांनी वाचला नसेल तर. त्यामुळे त्यांनी सावरकर यांचा अपमान केला असल्याची टीकाही त्यांच्यावर केली आहे.

सावरकर यांच्यावरील टीका केल्याप्रकरणी त्यांना राजकीय स्वरुपाच्या पद्धतीने त्यांना त्यांचा हिशोब चुकवावा लागेल असंही त्यांनी सांगितले आहे.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा 20 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करणार आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही भारत जोडो यात्रा कर्नाटक, तेलंगाना आणि महाराष्ट्रमधून ती आता मध्य प्रदेशात प्रवेश करणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी आणि वरिष्ठ नेते 25 नोव्हेंबर रोजी ते ओंकारेश्वर महादेव मंदिराचा दौरा करणार आहेत.

रॉबिनहूड ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तंट्या मामाच्या जन्मस्थळालाही राहुल गांधी भेट देणार आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.