‘कोरोना संपलाय, मास्क लावण्याची गरज नाही; मास्क लावले तर ब्युटीपार्लर्स कशी चालणार?’

लोकांनी आता तोंडावर मास्क लावण्याची गरज नाही. जेव्हा तशी गरज वाटेल तेव्हा आम्ही लोकांना सूचना देऊ. | Coronavirus hemant biswa sarma

'कोरोना संपलाय, मास्क लावण्याची गरज नाही; मास्क लावले तर ब्युटीपार्लर्स कशी चालणार?'
हेमंत बिस्वा शर्मा हे आसामचे आरोग्यमंत्री आहेत.
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 2:24 PM

दिसपूर: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने रविवारी उच्चांक गाठला असताना निवडणुकीच्या प्रचारात मश्गुल असलेले भाजप नेते हेमंत बिस्वा सर्मा (hemant biswa sarma) यांनी कोरोनाबाबत मुक्ताफळे उधळली आहेत. कोरोना (Coronavirus) हा पळून गेला आहे. त्यामुळे आता तोंडावर मास्क लावण्याची गरज नाही, असे सर्मा यांनी म्हटले. (Assam health minister hemant biswa sarma said no need to wear mask coronavirus fled away)

हेमंत बिस्वा शर्मा हे आसामचे आरोग्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्येही आहेत. मात्र, सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी कोरोना रोखण्यासाठीचे सर्व नियम खुंटीला टांगल्याचे दिसत आहे. ‘इंडिया टुडे’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, आसामच्या लोकांनी आता तोंडावर मास्क लावण्याची गरज नाही. जेव्हा तशी गरज वाटेल तेव्हा आम्ही लोकांना सूचना देऊ. लोकांनी मास्क घालूनच फिरायचे ठरवले तर मग ब्युटीपार्लर्स कशी चालणार? ब्युटीपार्लस चालायला पाहिजेत, अर्थव्यवस्था सुधारायला हवी, असे हेमंत बिस्वा सर्मा यांनी सांगितले.

तत्पूर्वी निवडणूक आयोगाने हेमंत बिस्वा सर्मा यांच्यावर कारवाई केली होती. बीपीएफचे अध्यक्ष हग्रामा मोहिलारी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे हेमंत बिस्वा सर्मा यांना 48 तास प्रचारबंदीची शिक्षा सुनावण्यात आली होती. याविरोधात सर्मा यांनी उच्च न्यायालायात धाव घेतली. तेव्हा शिक्षेचा कालावधी 24 तास इतका करण्यात आला.

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 92 हजार नवे रुग्ण

हेमंत बिस्वा सर्मा यांच्या मते कोरोना गेला असला तरी गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 92 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 500 जणांचा मृत्यू झाला. एका दिवसांत इतक्या मोठ्या संख्येत करोनाचे नवीन रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात करोनाचे 96,787 रुग्ण आढळले होते.

पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीला प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. पॉल यांच्यासह अनेक महत्त्वाचे अधिकारी या बैठकीत उपस्थित असल्याचे समजते.

संबंधित बातम्या:

लॉकडाऊन की कठोर निर्बंध?, मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक; संध्याकाळपर्यंत नवी गाईडलाईन जारी होणार?

Mumbai Corona: गर्दी अशीच राहिली तर मुंबईबाबत आजच्या आजच कठोर निर्णय; अस्लम शेख यांचं मोठं विधान

मुंबईत कोरोना रुग्णांसाठी 4000 बेड शिल्लक, आवडत्या रुग्णालयाची वाट न पाहण्याचं आवाहन

(Assam health minister hemant biswa sarma said no need to wear mask coronavirus fled away)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.