‘शेती नापीक जमिनीवर नाही, सुपीक जमिनीवर केली जाते’, हिंदू मुलींबद्दल ‘या’ खासदाराची जीभ घसरली..

हिंदूं लोकं लग्न करतात मात्र ती कुटुंबाच्या दबावामुळे लग्न करतात, त्यामुळे मग मुलं जन्माला कशी येणार असंही विधान त्यांनी केले आहे.

'शेती नापीक जमिनीवर नाही, सुपीक जमिनीवर केली जाते', हिंदू मुलींबद्दल 'या' खासदाराची जीभ घसरली..
Follow us
| Updated on: Dec 03, 2022 | 12:12 AM

नवी दिल्लीः आसामाचे खासदार बदरुद्दीन अजमल यांनी आज एक धक्कादायक विधान केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, हिंदूंची लोकसंख्या वाढविण्यासाठी मुस्लिमांचा फॉर्म्यूला वापरा  आणि हिंदू मुलींची 18 ते 20 व्या वर्षीच त्यांचा विवाह केला पाहिजे असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे. हिंदू समाजाबद्दल बोलताना खासदार अजमल म्हणाले की, हिंदूंची एक समस्या आहे. ती म्हणजे हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमांच्या वेगाने वाढत नाही. त्याची त्यांनी कारणं सांगितली.

ते म्हणाले की, हिंदू माणसं योग्य वयात लग्न करत नाहीत. आणि घराबाहेर मात्र दोन-दोन, तीन-तीन प्रेमप्रकरण करत असताता.

वय झालं तरी ते लग्न करत नाहीत, आणि लग्न केलं तर मात्र ते 40 व्या वर्षी लग्न करतात. त्यामुळे त्यांची लोकसंख्या वाढत नाही असं धक्कादायक विधान केले आहे.

लोकसंख्या वाढीची समस्या प्रचंड असतानाच बदरुद्दीन अजमल यांचे हे विधान प्रचंड गंभीर असल्याचे बोलले जात आहे.

खासदार बदरुद्दीन अजमल यांनी हे वक्तव्य केल्यानंतर मात्र भाजपने त्यांना ही असली विधानं आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे. हिंदूंच्या विवाहाबाबतही त्यांनी धक्कादायक आणि खालच्या पातळीवर जाऊन विधान केले आहे.

हिंदूंवर टीका करताना ते म्हणतात की, हिंदूं लोकं लग्न करतात मात्र ती कुटुंबाच्या दबावामुळे लग्न करतात, त्यामुळे मग मुलं जन्माला कशी येणार असंही विधान त्यांनी केले आहे.

हिंदूंवर ही टीका करत असतानाच त्यांनी मुस्लिम समाजात मात्र मुलीचं लग्न 18 व्या वर्षीच  करतात असंही त्यांनी सांगितले आहे.

मुस्लिम समाजातील लग्नाबाबत बोलताना त्यांनी भारत सरकार आमच्या समाजात मुलींच्या लग्नास 18 व्या वर्षी मान्यता देतं तर मुलांच्या लग्नास 22 वर्षी मान्यता देते. त्यामुळे आमच्या समाजाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हिंदूनीही मुस्लिम समाजाचा लग्नाचा फॉर्म्यूला वापरवा असा सल्ला दिला आहे.

लग्नाबाबत मुस्लिम समाजाचा फॉर्म्यूला वापरावा आणि आपल्या मुलींची लग्न 18 व्या करावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे. मुलींबद्दल बोलताना त्यांनी जमिनीचा दाखला देत म्हटले आहे की, शेती नापीक जमिनीवर केली जात नाही तर ती सुपीक जमिनीवर केली जाते असे खालच्या पातळीवर जात त्यांनी वक्तव्य केले आहे.

खासदार अजमल यांच्या या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाजपच्या आमदारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, हिंदू बद्दल अशी वक्तव्य केली गेली तर ती आम्ही खपवून घेणार नाही.

आणि अशी वक्तव्य करायची असतील तर तु्म्ही बांगलादेशात जा आणि तिथे तुमचे ज्ञान पाजळा असा इशाराही त्यांनी दिला आहे. आणि आम्हाला मुस्लिमांकडूनही काहीही शिकण्याची गरजही नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.