ISIS च्या इंडिया चीफला साथीदारासह अटक, देशातील अनेक अतिरेकी कटकारस्थानात सहभाग

इसिस ही अतिरेकी संघटना एक असे जग निर्माण करू इच्छिते जिथे त्यांच्या मर्जीनुसार इस्लामचा शरीयत कायदा लागू करता येईल. जगातील मुस्लीमबहुल प्रांत यांना आपल्या ताब्यात हवे आहेत. अमेरिकेने कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम फॉर 2014 मध्ये म्हटले आहे की अल कायदा या दहशतवादी संघटनेला पाठी टाकून आता इस्लामिक स्टेट जगातीस सर्वात क्रुर अतिरेकी संघटना बनत चालली आहे.

ISIS च्या इंडिया चीफला साथीदारासह अटक, देशातील अनेक अतिरेकी कटकारस्थानात सहभाग
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 10:38 PM

नवी दिल्ली | 20 मार्च 2024 : इसिस म्हणजेच इस्लामिक स्टेट या संघटनेच्या देशातील प्रमुखाला अटक करण्यात आसामच्या पोलिसांना मोठे यश आले आहे. ISIS च्या भारत प्रमुखासह दोन जणांना आसामच्या पोलिसांनी अटक केली आहे. आयएसआयएसचा भारतातील म्होरका आणि त्याचे दोन साथीदारांना बांग्लादेशाची सीमा पार केल्यानंतर बुधवारी धुबरी जिल्ह्यातून अटत करण्यात यश आल्याचे आसामच्या पोलिसांनी म्हटले आहे.

आसाम पोलिसांच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रणबज्योती गोस्वामी यांनी या संदर्भात माहीती दिली आहे. आसाम पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमी आधारे विशेष कृती पथकाने धर्मशाला येथून इसिसच्या भारत प्रमुखाला त्याच्या साथीदारांसह अटक केली आहे. त्यानंतर त्यांना गुवाहाटी येथील एसटीएफच्या कार्यालयात आणले आहे. दोघांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीत डेहराडूनच्या चकराला येथील आरोपी हारीस फारुकी ऊर्फ हरीश अजमल फारुखी भारताती इसिसचा प्रमुख आहे.

अतिरेकी हारीस फारुकी याचा साथीदार अनुराग सिंह ऊर्फ रेहान या पानीपतच्या अतिरेक्याने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तर त्याची पत्नी बांग्लादेशी नागरिक आहे. हे दोन्ही आरोपी भारतातील आयएसआयएसचे अत्यंत प्रशिक्षित आणि कडवे सदस्य आहेत. त्यांनी भारतात अनेक ठिकाणाहून आपल्या इसिस संघटनेत भरती केली होती. तसेच अतिरेकी कारवायासाठी निधी उभा केला आहे. तसेच अतिरेकी कारवायांना तडीस नेण्याच्या कटकारस्थानात सहभाग घेतला आहे. या दोघांवर एनआयए दिल्ली, एटीएस आणि लखनऊ सहीत अन्य ठिकाणांवर अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. आसाम एसटीएफ आता या दोघांना पुढील कारवाई करण्यासाठी एनआयएच्या ताब्यात देणार आहे.

कशी झाली इसिसचा स्थापना ?

सिरीया आणि इराकमधील अस्थिर सरकारमुळे इस्लामिक स्टेट या अतिरेकी संघटनेचा जन्म झाला. ही एक सुन्नी मुस्लीमांची अतिरेकी संघटना आहे. अल कायदा पासून फूटून ही संघटना तयार झाली आहे. यांच्या झेंड्यावर ‘अल्लाह शिवाय दुसरा कोणीही खुदा नाही’ असे लिहीले आहे. इसिस स्वत:ला इस्मालचा प्रचारक मानते. इसिसने स्वत:च्या प्रमुखाला जगातील सर्व मुस्लीमांचा खलीफा घोषीत केले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.