राहुल गांधी भारत जोडोत व्यस्त तर काँग्रेसचे नेते पक्ष तोडण्यात…; व्हिडीओ बघा म्हणजे खात्री पटेल
राहुल गांधी भारत जोडो यात्रा करुन सगळ्यांना जोडण्याचं काम करत आहेत तर इकडे काँग्रेसमध्ये मात्र पक्षांतर्गतच फोडाफोडी आणि मारझोडीचे राजकारण सुरु आहे.
नवी दिल्लीः सध्या काँग्रेसमध्ये (Rajasthan) फुटीचे राजकारण करण्यासाठी विरोधकांची बिलकूल गरज नसल्याचे राजस्थानातीलच राजकारणामुळे स्पष्ट झाले आहे. राजस्थानपाठोपाठ आता आसाममध्येही (Assam) धुसफूस सुरु झाली आहे. त्यामुळे दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडीओही (Video Viral) समोर आला आहे. देशातील सर्वात जुना पक्ष असला तरी काँग्रेसची सध्याची अवस्था चांगली नाही. एकीकडे राहुल गांधी पक्ष प्रवेशासाठी बाहेर पडले आहेत, तर दुसरीकडे पक्षांतर्गत मात्र प्रचंड गदारोळ सुरू झाला आहे.
#WATCH | Assam: Clash b/w two groups of Congress workers broke out during a meeting held at Rajiv Bhawan in Assam’s Dhubri district on Monday. The meeting was organized to discuss the Bharat Jodo Yatra to be started in the state from November 1. pic.twitter.com/LEFQ4jdrie
— ANI (@ANI) September 26, 2022
सध्या राजस्थानमध्ये राजकीय उलथापालथींना प्रचंड वेग आला आहे. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी गेहलोत दावा करत होते, त्यांना अध्यक्षपद मिळाले तर त्यांच्यानंतरचा मुख्यमंत्री कोण यावरुन वाद सुरु झाला आहे.
काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते हा प्रश्न सोडवण्यासाठी जयपूर-दिल्ली हा प्रवास करत आहेत. तर त्याचवेळी आसाममधूनही राजकीय घडामोडींची बातमी समोर आली आहे.
काँग्रेसच्या सभेवेळीच येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपापसात मारामारी केली असल्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
आसाममधील धुबरी जिल्ह्यातील राजीव भवनात सोमवारी बैठक होती, त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी झाली.
आसाममधील या बैठकीत राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’बाबत चर्चा करण्यात येत होती. त्यावेळी अचानक काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना समोरासमोर भिडले. यावेळी दोन गटात जोरदार हाणामारी सुरू झाली होती.
राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ आसाममध्ये 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, त्याआधीच ही पक्षांतर्गत वाद वाढल्याने काँग्रेसवर टीकाही होत आहे.
काँग्रेसचे स्थानिक आमदार वाजेद अली चौधरी यांनी सांगितले की, जिल्हा पक्ष विभागाची अजून विभागणी केली गेली नाही.
त्यामुळे या दोन्ही गटांच्या प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. जिल्हा काँग्रेस अध्यक्षा पदावरुन येथे वाद सुरु आहेत. त्यामुळे या प्रकरणावर कोणीही वाद न घालता तो सोडवला जाईल असं ज्येष्ट नेत्यांकडून सांगण्यात येते होते.
हा मुद्दा चर्चेदरम्यान चालू असतानाच कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरु होऊन जोरदार हाणामारील झाली.
काँग्रेसशासित राजस्थानमधील राजकीय घडामोडींमध्ये राज्यातील सुमारे दीड डझन नेते तो वाद मिठवण्यााठी सक्रिय आहेत.
राजस्थानचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले अशोक गेहलोत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. त्यावरुन राजस्थानात वाद उफाळून आला होता.
डिसेंबर 2018 मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यावर मुख्यमंत्रिपदावरून सचिन पायलट यांच्याबरोबर त्यांचा संघर्ष झाला होता. तर जुलै 2020 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी गेहलोत यांच्या नेतृत्वाविरोधात बंडही सचिन पायलट यांनीचे केले होते.
मात्र या शह काटशहाच्या राजकारणा गेहलोत सचिन पायलट यांना भारी पडत त्यांनी आपली सत्ता शाबूत ठेवली होती. मात्र आता राजस्थानचे राजकारण गेहलोत विरुद्ध पायलट असेच झाले आहे.