Assembly Election : निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांना मुभा, आता सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत करु शकणार प्रचार

निवडणूक आयोगाकडून देशभरातील आणि खास करुन निवडणूक होत असलेल्या राज्यांमधील कोरोना स्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात आला. तसंच आयोगाने कोरोना स्थितीबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठीकीनंतर निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना प्रचाराबाबत मुभा दिली आहे.

Assembly Election : निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांना मुभा, आता सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत करु शकणार प्रचार
निवडणूक आयोग
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 11:26 PM

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2022) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission) शनिवारी राजकीय पक्षांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) कमी झाल्यानंतर आता सर्व राजकीय पक्ष घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करुन सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत प्रचार करु शकणार आहेत. निवडणूक आयोगाने आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या दिशा निर्देशानुसार निवडणूक होत असलेल्या राज्यांमध्ये पायी रॅलीला परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगाकडून देशभरातील आणि खास करुन निवडणूक होत असलेल्या राज्यांमधील कोरोना स्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात आला. तसंच आयोगाने कोरोना स्थितीबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठीकीनंतर निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना प्रचाराबाबत मुभा दिली आहे.

यापूर्वी पाच राज्यांच्या निवडणूक प्रक्रियेची घोषणा करताना निवडणूक आयोगाने रोड शो, पदयात्रा, वाहन रॅली आणि मेळाव्यांवरील बंदी 11 फेब्रुवारीपर्यंत वाढवली होती. मात्र सर्व टप्प्यांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करणाऱ्यांची संख्या, तसंच प्रचार सभांबाबतच्या नियमांमध्ये शिथिलता दिली होती. तसंच घरोघरी जाऊन प्रचार करणाऱ्यांच्या संख्येत वाढ करुन ती 20 करण्यात आली होती. तर जाहीर सभेत जास्तीत जास्त 1 हजार लोक सहभागी होऊ शकतात. आयोगाने इनडोअर बैठकांमझ्ये सहभागी होणाऱ्यांची अधिकाधिक संख्या 300 ने वाढवून 500 केली होती. दरम्यान, राज्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, राजकीय घडामोडीमुळे कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याची गरज आहे.

पाच राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, प्रचार जोरात!

देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला तर निवडणूक सुरु असलेल्या राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येचा आढावा घेतला तर 21 जानेवारीला जवळपास 3 लाख 47 हजारच्या घरात नवे रुग्ण आढलून आले होते. तर 12 फेब्रुवारी म्हणजे शनिवारच्या आकडेवारीनुसार देशभरात 50 हजार रुग्ण आढळून आले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यात 22 जानेवारी रोजी एकूण रुग्णांची संख्या 32 हजार इतकी होती. तर 12 फेब्रुवारीला ही संख्या 3 हजारावर आली आहे.

मोठ्या सभा, प्रत्यक्ष गाठीभेटींवर राजकीय पक्षांचा जोर

निवडणूक आयोगाने 8 जानेवारी रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली होती. त्यावेळी फिजिकल रॅली, रोड शो, आणि पदयात्रांवर बंदी घालण्यात आली होती. आयोगाने वेळोवेळी कोरोना स्थितीचा आढावा घेतला आणि काही प्रमाणात सूट दिली. पाचही राज्यात निवडणूक प्रचाराने जोर धरला आहे. सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले आहेत. मोठ्या सभा आणि प्रत्यक्ष भेटीगाठींवर राजकीय पक्षांचा भर असल्याचं पाहायला मिळत आहे.

इतर बातम्या :

Video: सोमनाथाचे लुटलेले दरवाजे जेव्हा महादजी शिंदेंनी परत आणले, ज्योतिरादित्य शिंदेकडून ऐका अंगावर काटा आणणारा प्रसंग

प्रत्येक राज्यात लोकसभा ते ग्रामपंचायत लढणार, आदित्य ठाकरेंची घोषणा; भाजपची कोंडी करण्यासाठी शिवसेनेची खेळी?

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.