हिजाबचा आमदाराला हिशोब दिला, भाजपने तिकीट नाकारताच आमदार ढसाढसा रडले…
भाजपने आपल्यावर केलेल्या वागणुकीबद्दल भट यांनी सांगितले की, या गोष्टीचा मला इतका धक्का बसला आहे की, त्यामुळे मला लगेच त्याबाबतचा मला काही निर्णय घेता येणार नाही.
मंगलोर : कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे भाजपने आता मोठी रणनीती आखली आहे. त्यामुळे आता भाजपने उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. हिजाबच्या वादामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या उडुपी विधानसभा मतदारसंघातील आमदार रघुपती भट यांचे भाजपने तिकीटचा पत्ताच कट केला आहे. तिकीट नाकारण्यात आल्याने नाराज झालेल्या रघुपती भट यांनी बुधवारी सांगितले की, पक्षाने आपल्याशी ज्या प्रकारे वागणूक दिली आहे, त्याच्यामुळे मला प्रचंड दुःख झाले आहे. उडुपी येथील आपल्या घरी पत्रकारांशी संवाद साधताना रघुपती भट यांना सांगितले की, पक्षाच्या निर्णयामुळे मी दु:खी नाही. पण पक्षाने मला ज्या प्रकारे वागणूक दिली आहे ती चुकीची आहे, त्याचा मला त्रास झाला असल्याचे सांगत त्यांना माध्यमांसमोर अश्रू आवरता आले नाहीत.
भाजपचे आमदार रघुपती भट यांनी सांगितले की, पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांनीही पक्षाच्या निर्णयाची माहिती देण्यासाठीही त्यांना फोन केला नाही आणि टीव्ही वरूनच त्याची मला माहिती मिळाली.
भाजप आमदाराने सांगितले की, अमित शाह यांनी जगदीश शेट्टर यांना फोन करून बदलाची माहिती दिली होती. अमित शाह यांनी मला बोलावण्याची अपेक्षा नाही, पण किमान जिल्हाध्यक्षांनी तरी तसे करायला हवे होते. केवळ माझ्या जातीमुळे मला तिकीट नाकारले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.
भारतीय जनता पक्षाला अथक परिश्रम करणाऱ्या लोकांची गरज राहिलेली नाही. त्यामुळे अत्यंत कठीण काळातही पक्षासाठी काम केले असून, मिळालेल्या संधींबद्दल कृतज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षाचे उमेदवार यशपाल सुवर्णा यांच्या राजकीय प्रवासासाठी मी त्यांना नेहमीच पाठिंबा दिला आहे. भाजपने आपल्यावर केलेल्या वागणुकीबद्दल भट यांनी सांगितले की, या गोष्टीचा मला इतका धक्का बसला आहे की, त्यामुळे मला लगेच त्याबाबतचा मला काही निर्णय घेता येणार नाही. त्यांच्या पुढील प्लॅनची माहिती घेण्यासाठी भट यांचे शेकडो समर्थक माझ्या निवासस्थानी जमले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.