आजचा विजय ऐतिहासिक, नरेंद्र मोदी यांनी भरला ओबीसींचा हुंकार
Assembly Election 2023 | लोकसभेपूर्वीच्या सेमी फायनलमध्ये भाजपने मोठी बाजी मारली. या विजयाचे शिल्पकार पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या मुख्य कार्यालयात पोहचले आहे. या विजयाने भाजपमध्ये आनंदाची लहर उमटली आहे. कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष आहे. आता पंतप्रधान मोदी यांच्या रणनीतीची चर्चा रंगली आहे. ते काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : तीन राज्यातील निवडणुकांनी लोकसभेचे चित्रच जणू स्पष्ट केले आहे. काँग्रेसच्या हातून दोन राज्या खेचून आणण्यात भाजपने यश मिळवले आहे. मध्यप्रदेशात तर भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. सोशल इंजिनिअरिंग आणि ओबीसीचे समीकरण जुळविण्यात भाजपला यश आले आहे. या विजयाचे शिल्पकार पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात दाखल झाले आहे. मोंदी यांच्या नेतृत्वातील हा मोठा विजय मानण्यात येत आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मोदी है तो मुमकिन है, हा नारा दिला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच कार्यकर्त्यांना संबोधित करत आहे. त्यांच्या रणनीतीची सध्या चर्चा रंगली आहे.
आवाज तेलंगणापर्यंत पोहचायला हवा
आवाज तेलंगनापर्यंत पोहोचला पाहिजे. आजचा विजय ऐतिहासिक आहे. अभूतपूर्व आहे. आज सबका साथ सबका विकासाची भावना विजयी झालीय. आज विकसित भारताच्या आवाहानाचा विजय झालाय. आज आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय झाला. आज वंचितांना पुढे आणण्याच्या विचाराचा विजय झाला. आज भारताच्या विकासासाठी राज्याच्या विकासाच्या विचाराचा विजय झाला. आज इमानदारी, पारदर्शिकता आणि सुशासनचा विजय झाला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
सर्व मतदारांचे मानले आभार
मी या मंचावरून सर्व मतदारांना आदरपूर्वक नमन करतो. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या लोकांनी भाजपावर प्रेम दाखवलं आहे. तेलंगनातही भाजपाला पाठिंबा वाढत आहे. आपल्या कुटुंबाला एवढं प्रेम मिळतं, विश्वास मिळतो, त्यामुळे मी व्यक्तिगतरित्या अनुभव करतो की माझी जबाबदारी अधिक वाढते. आज सुद्धा माझ्या मनात हीच भावना आहे. मी आपल्या आई, बहीण, मुली आणि युवा साथी, शेतकरी आणि गरीब कुटुंबांच्या समोर त्यांनी जो निर्णय घेतला. आपल्याला समर्थन दिलं. त्याबद्दल मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतोय, असे आभार पंतप्रधानांनी मानले.