Khalistan Terrorist | पंजाबवर असा कब्जा मिळवणार, खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत पन्नू बरळला

Khalistan Terrorist | चीन आणि पाकिस्तानच्या जीवावर उड्या मारणारा खलिस्तानचा पोपट, गुरुपतवंत पन्नू पुन्हा एकदा बरळला. या दहशतवाद्याने भारताला धमकी दिली आहे. अर्थात त्याला एनकाऊंटरची भीती सतावत आहे. त्यामुळे डोक्यावर परिणाम झाल्यासारखे उगाच काही तरी वक्तव्य करुन तो स्वतःचे महत्व वाढून घेत आहे. काय दिली त्याने धमकी?

Khalistan Terrorist | पंजाबवर असा कब्जा मिळवणार, खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत पन्नू बरळला
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 3:47 PM

नवी दिल्ली | 11 ऑक्टोबर 2023 : खलिस्तानचा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurupatwant Singh Pannu) याने पुन्हा एकदा फडफडण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान आणि चीनच्या जीवावर तो उडत आहे. परदेशात खलिस्तान चळवळीसाठी तरुण जमविण्याचे आणि त्यांची माथी भडकवण्याचे काम तो करत आहे. त्याला पण एनकाऊंटरची भीती सतावत आहे. काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याविषयी त्याने काही वक्तव्य केली होती. त्याच्याविरोधात भारतात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नाराज होत त्याने आता नवीन धमकी दिली आहे. डोक्यावर परिणाम झाल्यासारखा तो बरळत आहे. काय आहे त्याची धमकी?

हिंसेचे उत्तर हिंसेने

खलिस्तानचा दहशतवादी गुरुपतवंत सिंह पन्नू याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यात तो इस्त्राईल-पॅलेस्टाईन युद्धापासून धडा घेण्याची धमकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देत आहे. अशीच प्रतिक्रिया भारतात उमटू शकते. पंजाबपासून ते पॅलेस्टाईनपर्यंत ज्या भूभागावर कब्जा करण्यात आला आहे, त्यावर तिथले लोक प्रतिक्रिया देतील. हिसेंचे उत्तर हिसेंने देण्यात येईल, असा तो म्हणाला. हमास सारखा हल्ला करण्याचा विचार तो करत असल्याचे समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

म्हणे हमास सारखा हल्ला करणार

भारताने पंजाबवर कब्जा सुरुच ठेवला तर अशीच प्रतिक्रिया देण्यात येईल. भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी जबाबदार असतील. शिख फॉर जस्टीस ही संघटना बॅलेट आणि वोट यावर विश्वास ठेवते. पण भारताने आता निश्चित करावं की त्यांना बॅलेट हवं की बुलेट? अशी धमकी त्याने दिली आहे. दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा बदला घेणार असल्याचा तो व्हिडिओत बरळत आहे.

कोण आहे हा भामटा?

गुरुपतवंत सिंह पन्नू हा मुळचा अमृतसरचा रहिवाशी आहे. 2019 मध्ये पहिल्यांदा तो राष्ट्रीय तपास एजन्सीच्या (NIA) रडारवर आला होता. त्याच्याविरोधात पहिल्यांदा गुन्हा नोंदविण्यात आला होता. तो पाकिस्तानच्या आणि चीनच्या फंडिंगवर तरुणांची भरती करतो. भारत विरोधी कारवाईसाठी या तरुणांचा वापर करण्यात येत आहे. देशातही हिंसा भडकविण्यासाठी त्यांचा वापर करण्याची योजना तो आखत आहे.

पन्नूची संपत्ती जप्त

विशेष NIA न्यायालयाने त्याला 3 फेब्रुवारी 2021 रोजी गुरुपतवंत सिंह पन्नू विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. त्याला गुन्हेगार म्हणून घोषीत करण्यात आले आहे. एनआयएने त्याची संपत्ती जप्त केली आहे. पंजाबमध्ये त्याची ही मिळकत होती. त्यावर टाच आणण्यात आली आहे.

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.