Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी फक्त 84 सेकंदाचा शुभ मुहूर्त, या मंत्राचं होणार उच्चारण

अयोध्येत भव्य राममंदिराची निर्मिती सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असलेली रामभक्तांची प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे. 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू रामचंद्र मंदिरात विराजमान होणार आहेत. या दिवशी फक्त 84 सेकंदाचा मुहूर्त असून फक्त एका प्रभावी मंत्राने गाभाऱ्यात प्रभू रामचंद्रांची मूर्ती विराजमान होणार आहे.

प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी फक्त 84 सेकंदाचा शुभ मुहूर्त, या मंत्राचं होणार उच्चारण
Ram Mandir
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 7:23 PM

मुंबई : प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी संपूर्ण अयोध्यानगरी सजली आहे. शेकडो वर्षांनंतर प्रभू रामचंद्र मंदिरात विराजमान होणार आहेत. त्यामुळे रामभक्तांच्या आनंदाला उधाण आलं आहे. मंदिरात श्री रामांची मूर्ती विराजमान करण्यापूर्वी पाच दिवस पूजापाठ होणार आहे. तर 22 जानेवारी 2024 रोडी 84 सेकंदाच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू रामचंद्र गाभाऱ्यात विराजमान होतील. 84 सेकंदाच्या मुहूर्तावर फक्त एका प्रभावी मंत्राचा जाप केला जाईल. प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त काढणाऱ्या काशीच्या विद्वान पंडित गणेश्वर शास्त्री द्रविण यांनी ही माहिती दिली आहे. 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12.29 मिनिट आणि 8 सेकंदांनी मुहूर्त सुरु होईल आणि 12.30 वाजून 32 सेकंदापर्यंत हा मुहूर्त असेल. यावेळी मुहूर्ता दरम्यान ‘प्रतितिष्ठत परमेश्वर’ या मंत्राचं उच्चारण होईल आणि प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना होईल. या मंत्राचा अर्थ देवा तुम्ही विराजमान व्हा असा आहे. हिंदू धर्मातील ‘धर्म सिंधु’ ग्रंथात देव विग्रहच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी हा मंत्र प्रभावी असल्याचं सांगितलं आहे.

22 जानेवारीच्या शुभ मुहूर्तावेळी नऊ पैकी 6 ग्रह एकत्र असणार आहेत. गुरुची पूर्ण दृष्टी पाचव्या, सातव्या आणि नवव्या स्थानावर असेल. बुध आणि शुक्र नव्या स्थानात असतील. ज्योतिषशास्त्रानुसार नवव्या स्थानातील बुध ग्रह सर्व दोष दूर करतो. तर शुक्रही त्या दोषांचं निवारण करतो. त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी हा मुहूर्त धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

दुसरं म्हणजे या मुहूर्तावेळी अशुभ मानले जाणार पाच बाण योग नसतील. यात रोग बाण, चोर बाण, मृत्यू बाण, अग्नि बाण आणि राज बाण समावेश असतो. हे अशुभ योग मानले जातात. त्यामुळे या मुहूर्ताचं विशेष असं महत्त्व आहे. प्राणप्रतिष्ठेवेळी गाभाऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फक्त पाच जण उपस्थित असतील. मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी दूर केली जाईल आणि दोन सेकंदाचा ‘प्रतितिष्ठत परमेश्वर’ हा मंत्र उच्चारला जाईल.

VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन.
ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका
ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका.
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका.
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं.
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी.