राजधानी एक्सप्रेसच्या जेवणाने ऑस्ट्रेलीयन प्रवासी झाला जाम खूष, रेल्वेमंत्र्याला म्हटला याच खानसाम्याला एम्बॅसेडर बनवा

भारतीय रेल्वेच्या अनेक ट्रेन तिच्या स्वादीष्ठ जेवणामुळे ओळखल्या जातात. राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका ऑस्ट्रेलीयन प्रवाशाने काय म्हटलंय पाहा

राजधानी एक्सप्रेसच्या जेवणाने ऑस्ट्रेलीयन प्रवासी झाला जाम खूष, रेल्वेमंत्र्याला म्हटला याच खानसाम्याला एम्बॅसेडर बनवा
rajdhani-foodImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 3:00 PM

नवी दिल्ली : भारतीय जेवणाविषयी परदेशी नागरिकांना नेहमीच आकर्षण राहीले आहे. भारतीय ( INDIAN ) संस्कृतीत तयार केल्या जात असलेल्या विविध डीशेसची चव त्यांच्या जिभेवर रेंगाळत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे राजधानी एक्सप्रेसमधून ( RAJDHANIEXPRESS )  फिरणाऱ्या एका ऑस्ट्रेलीयाच्या प्रवाशाने ( australian passenger ) राजधानीत मिळणाऱ्या विविध अन्न पदार्थांची चव चाखत खूपच तारीफ केली आहे. राजधानी एक्सप्रेसमधील जेवण बनविणाऱ्या शेफ सोबतचा फोटो त्यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करीत त्यांनाचा रेल्वेच्या योजनेचा दूत बनविण्याची मागणी केली आहे.

रेल्वेच्या जेवणाबाबत मतेमतांतरे आहेत. अनेकदा जेवणातील दर्जाबाबत प्रवासी काही तक्रारी व सूचनाही करीत असतात. भारतीय रेल्वेच्या अनेक ट्रेन तिच्या स्वादीष्ठ जेवणामुळे ओळखल्या जातात. मुंबई ते पुणे धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या प्रसिध्द डायनिंग कारचा मेन्यू मुंबई आणि पुणेकरांमध्ये चांगलाच प्रसिध्द आहे. डेक्कन क्वीनच्या ऑम्लेट सँडविच, कटलेट सँडविच, साबुदाणा वडा आणि गरमागरम चहा आणि कॉफीचा स्वाद प्रवाशांच्या जिभेवर रेंगाळत असतो. राजधानी, शताद्बी , दुरांतो सारख्या रेल्वेच्या अनेक प्रतिष्ठीत गाड्यांमध्ये चांगले जेवण दिले जात असते. अशात एका ऑस्ट्रेलियन प्रवाशाने राजधानीने प्रवास करताना त्यांना दिलेल्या डीनरने बेहद्द खूश झाले आहेत.

सल्वातोर बबोन्स असे या ऑस्ट्रेलियन प्रवाशाचे नाव असून त्यांना राजधानीत मिळालेल्या जेवणाची तारीफ करताना त्यांनी ट्वीटरवर रेल्वेमंत्र्यांना मोठी मागणी केली. त्याने राजधानी वाढलेल्या जेवणाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यांना डीनरमध्ये चिकन करी, भात, चपात्या आणि दही वाढण्यात आले. यावेळी जेवण बनविणारे शेफ नरेंद्र कुमार यांच्यासह त्यांनी स्वत:चा फोटोही शेअर केला आहे. त्यांनी ट्वीटरवर पोस्ट करताना लिहीले आहे की, ‘ हे भारतीय रेल्वेच्या सेंकड क्लासच्या डब्यातील जेवण असले तरी, यात मला फर्स्टक्लासची चव लागत आहे. मी या जेवणाने खूपच आनंदीत झालो आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तुम्ही नरेंद्र कुमार यांना आपला आंतरराष्ट्रीय ब्रांड एम्बेसेडर बनवायला हवे. राजधानी एक्सप्रेसच्या किचनला मी पाच स्टार देत आहे. अपडेट – फ्रि आयस्क्रीम !’

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.