भविष्यात कॉंग्रेस सत्तेत परतणे कठीण, या पुस्तकात लेखकाने केला दावा
राजकीय विश्लेषक प्रियम गांधी मोदी यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात कॉंग्रेसची सत्ता निजिकच्या काळा येणे कठीण असल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेसला आपले विरोधी पक्ष नेते पद टिकविण्यासाठी देखील खूपच प्रयत्न करावे लागणार असल्याचे लेखकाने म्हटले आहे.
मुंबई | 8 जानेवारी 2024 : कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी एकीकडे त्यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरु करण्याची सुरुवात करीत आहेत. दुसरीकडे एका पुस्तकातील लेखकाच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. राजकीय विश्लेषक प्रियम गांधी मोदी यांनी त्यांच्या नवीन पुस्तकात कॉंग्रेसच्या भविष्याबद्दल खूप काही नकारात्क लिहीले आहे. ‘ व्हॉट इफ देअर वॉज नो कॉंग्रेस : द अनसेंसर्ड हिस्ट्री ऑफ इंडिपेंडेंट इंडिया’ या नव्या पुस्तकात लेखक मोदी यांनी नजिकच्या भविष्यात कॉंग्रेसला सत्ता मिळणे खूपच कठीण असल्याचे म्हटले आहे. लेखकाने कॉंग्रेस नेते महात्मा गांधी यांनी एकदा कॉंग्रेसला बरखास्त करा असे म्हटल्याची आठवण करुन दिली आहे.
गेल्या दशकात ज्या भारताने आकार घेतला आहे, त्यात कॉंग्रेसचे सत्ता असलेला भारत केव्हाच मागे पडला आहे. कॉंग्रेसच्या अस्तित्वावरच संकट आले असून आता कॉंग्रसची सत्ता वापसी होणे कठीण असल्याचे लेखक प्रियम गांधी मोदी यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसला त्यांचे विरोधी पक्ष नेते पदही मिळण्याची शक्यता धूसर आहे. जर गेली 80 वर्षे बहुतांशी कॉंग्रेसचे राज्य होते. परंतू जर या वर्षांत कॉंग्रेस सत्तेत नसती तर देशाचे भविष्य निश्चितच वेगळे असते असे लेखकाचे म्हणणे आहे. रुपा पब्लिकेशनद्वार प्रकाशित या पुस्तकात गेल्या 80 वर्षातील भारतावर परिणाम करणाऱ्या घटनांचा मागोवा घेतला आहे. त्यात फाळणी, काश्मीर, प्रशासन, घोटाळे, लोकशाही आणि त्यातून आलेली संकटे, आर्थिक नीती, बौद्धीक स्थलांतरण, विदेशी गुंतवणूक आणि परराष्ट्र धोरणावर लेखकाने आपली मते मांडली आहेत.
देशाची जनता भ्रष्टाचाराच्या ऐवजी प्रगती, खोट्या गोष्टी ऐवजी सत्य, दहशतवादा ऐवजी सुरक्षा, अडथळ्यांऐवजी आपल्या विकासाला निवडते असा लेखकाने दावा केला आहे. येत्या वर्षांत कॉंग्रेसचे सत्तेत पुन्हा येणे अशक्य नसले तरी कठीण मात्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या साल 2022 च्या फेब्रुवारीच्या हिवाळी अधिवेशनात एक प्रश्न विचारला होता की जर देशात जर कॉंग्रेस नसती तर काय झाले असते ? तेव्हा भारताच्या बुध्दीजीवी वर्ग, इतिहासकार आणि सोशल मिडीयावरील फौजेला या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे बनले. यातील काहींनी त्यांच्या विचारांचे समर्थन केले तर काहींनी विरोध केला.
कॉंग्रेस नेतृत्वाच्या चुका
कॉंग्रेसने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका निभावली. परंतू कॉंग्रेस नेतृत्वाने चुका देखील केल्या ज्यामुळे अखंड भारताचे तुकडे झाले. जर कॉंग्रेस विसर्जित करण्याचे महात्मा गांधी यांचे आवाहन मानले गेले असते तर आजचा भारत कसा असता ? असा सवाल लेखकाने केला आहे. महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतर अखेर कॉंग्रेसला विसर्जित करण्याचा सल्ला का दिला होता ? आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यावेळची परिस्थिती, त्यावेळेचे राजकारण त्यातील विचारधारा समजण्याचा आपण प्रयत्न केल्याचे लेखकाचे म्हणणे आहे.