मुलींनो भारतात येऊ नका… तिची पोस्ट येताच खळबळ; लाज वाटली पाहिजे, पाकिस्तानात जा, नेटकरी भडकले
कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला. नाईट ड्युटीवर असलेल्या या महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. देशातील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. अशा वेळी एका सोशल मीडिया इन्फ्लुअन्सरच्या ट्विटने खळबळ उडाली आहे.
कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्काराने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या घटनेचे अजूनही देशभर पडसाद उमटत आहेत. ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. तसेच मुलींच्या सुरक्षेवरही सवाल केले जात आहेत. याच दरम्यान सोशल मीडियावरील एका पोस्टने खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आणि ट्रॅव्हलर तान्या खानीजो हिने एक ट्विट केलं आहे. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. तिच्या या पोस्टवरून तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
तान्याने ट्विटरवर पोस्ट लिहिली आहे. भारतात महिलांच्या सुरक्षेची वाईट परिस्थिती आहे. जोपर्यंत आमचे पुढारी महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याचा मुद्दा गंभीरपणे घेत नाही, तोपर्यंत विदेशात राहणाऱ्या महिलांनी भारतात येऊ नये. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. कोणत्याही परिस्थितीत भारतात येऊ नका, असं तान्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Safety standards for women in India are horrible. My sincere request to all my women friends abroad. Please don’t travel here unless our dear leadership seriously creates a safer environment for women. Please avoid coming to India at all costs! #kolkata #RGKarHospital…
— Tanya Khanijow (@TanyaKhanijow) August 12, 2024
तुला तर लाज वाटली पाहिजे
तान्याची ही पोस्ट येताच लोक भडकले आहेत. संपूर्ण देशाला बदनाम केलं जात असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. तुम्ही मुद्द्यांना जनरलाईज करत असून देशाला बदनाम करत आहात, असं नेटकरी म्हणत आहेत. @shantiswarup4u या आयडीवरून एका यूजर्सने तान्याला खडेबोल सुनावले आहेत. तुला स्वत:ला भारतीय म्हणून घेण्याची लाज वाटली पाहिजे. ही घटना देशातील सर्वात शांत राज्यात झाली आहे. तिथली महिला सुद्धा मुख्यमंत्री आहे. महिला सुरक्षेच्या कारणास्वत तू संपूर्ण देशाला शिव्या हालत आहेस, असं या आयडीवरून खडसावण्यात आलं आहे.
मी स्वत: शोषणाची बळी
बरं एवढं करून तान्या थांबली नाही. तिने अजून एक ट्विट केलं आहे. हे असंच आहे. जोपर्यंत लक्ष दिलं जात नाही, तोपर्यंत काहीच बदलणार नाही. मी स्वत: देशातील प्रत्येक भागात शोषणाला बळी पडली आहे. आपला समाज महिलांच्याबाबत फेल आहे. जोपर्यंत कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आपण सुरक्षित राहू शकणार नाही, असं तान्याने म्हटलं आहे.
महिलांना विचारून तर पाहा…
केवळ ही एकच घटना नाहीये. तुम्ही कोणत्याही महिलेला विचारून पाहा. असा अनुभव घेतला नाही, अशी एकही महिला नसेल. मीही त्यात आहेच. आपला सुरक्षा मानक अत्यंत खराब आहे. ही भारताची समस्या आहे, असंही तान्याने म्हटलं आहे. दरम्यान, तान्याचा हा विरोध लोकांच्या पचनी पडलेला नाही. त्यांनी सोशल मीडिया आणि यूट्यूबवरूनही तिच्यावर टीका केली आहे. अनेकांनी तर तान्याला सोशल मीडिया आणि यूट्यूबवरून बायकॉट केलं आहे. तुला एवढंच वाटत असेल तर तू देश सोडून पाकिस्तानात का जात नाही? असं एका संतप्त यूजर्सने म्हटलं आहे.