Ram Mandir : अयोध्येत प्रॉपर्टी विकत घेण्याचं स्वप्न ? आधी जमिनीचे भाव तर जाणून घ्या…वेगाने वाढले रेट
Ayodhya Property Rates : अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचे भव्य तयार झाले आहे. अशा वेळी रामनगरीत सर्व आवश्यक तयारीही पूर्ण झाल्या आहेत. येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमापूर्वी अयोध्येत जमीनीच्या दरात बरीच वाढ झाली आहे.
Ayodhya Property Rates : अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येत्या 22 जानेवारीला भव्य राम मंदिरात रामललाची मूर्तीची स्थापना होणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरु आहे. अयोध्यानगरी अगदी राममय झाली आहे. प्रा-प्रतिष्ठेच्या या कार्यक्रमासाठी देशभरातील हजारो लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे.
प्रभू श्रीरामाचे मंदिर तयार होताच आता अयोध्येचे वैभवही परत यायला लागले आहे. राम मंदिराचा सकारात्मक परिणाम अयोध्येतील प्रत्येक क्षेत्रावर होताना दिसत आहे. त्यामुळे रिअल इस्टेट बाजारातही मोठी उसळण पहायला मिळत आहे. एका रिपोर्टनुसार, अयोध्येमध्ये प्रॉपर्टीच्या किमती किंवा दरामध्ये तिप्पट-चौपट वाढ झाली आहे. रिअल इस्टेट एक्स्पर्ट्सच्या सांगण्यानुसार, ही वाढ आता रॉकेटच्या वेगाने वर जाईल. कारण बाहेरच्या गुंतवणूकदारांप्रमाणेच स्थानिक खरेदीदारसुद्धा आता प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करत आहेत. मोठ-मोठ्या हॉटेल ब्रँड्ससह अनेक रिअल इस्टेट कंपन्यानांही अयोध्येत गुंतवणूक करायची आहे.
तिप्पट- चौपट वाढल्या किमती
राममंदिराचा सकारात्मक परिणाम केवळ अयोध्येपुरताच मर्यादित नाही, पण अयोध्येतील बाहेरील क्षेत्रातील जमीनींच्या किमतीही बऱ्याच वाढत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही दरवाढ इतक्यात कमी होणार नाही. खरंतर, अयोध्या शहरात ज्या जमीनीचा दर 1000-2000 (रुपये) प्रति स्क्वेअर फूट इतका होता तो आता 4000-6000 (रुपये) प्रति स्क्वेअर फूट इतका झाला आहे.
तर फैजाबाद रोड क्षेत्रातील ज्या जमिनीचा दर 400-700 (रुपये) प्रति स्क्वेअर फूट इतका होता तो आता वाढून 1,500-3000 (रुपये) प्रति स्क्वेअर फूट एवढा झाला आहे. अशीच काहीशी परिस्थिती चौदह कोसी परिक्रमा आणि रिंग रोड जवळही आहे.
मोठ्या ब्रँड्सची आऊटलेट्सही उघडली
अयोध्या शहरात आता डॉमिनोज, पिझ्झा हट आणि बर्गर किंग सारख्या मोठ्या ब्रँड्सची आऊटलेट्सही उघडली आहेत. तसेच ब्रँडेड हॉटेल्स आणि रिअल इस्टेट कंपन्यांही अयोध्येमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. धार्मिक महत्वामुळे ओळखलं जाणारं अयोध्या शहर आता गुंतवणूकदारांची पहिली पसंती ठरत आहे.