पुणेकरांचा नॉनव्हेजला कडाडून विरोध, म्हणाले, “या” दिवशी चिकन, मटणाची दुकाने उघडी नकोच

Ram Mandir : 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभ पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी पुणेकरही सज्ज झाले आहेत. 22 जानेवारीला पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व मद्यविक्री तसेच मटण, चिकन, मासे शॉप दुकान बंद ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

पुणेकरांचा नॉनव्हेजला कडाडून विरोध, म्हणाले, या दिवशी चिकन, मटणाची दुकाने उघडी नकोच
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देशभरातील जनतेला उत्सुकता आहे. विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींना या सोहळ्याचं खास आमंत्रण देण्यात आलं आहे. बुधवारपासून काही सेलिब्रिटी अयोध्येत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या 22 जानेवारी रोजी राम मंदिरात राम ललाच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 10:52 AM

पुणे | 18 जानेवारी 2024 : 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभ पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू आहे. हा दिवस संपूर्ण देशवासियांसाठी ऐतिहासिक दिवस ठरणार असून यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्याचा उत्साह संपूर्ण देशातही दिसत असून पुणेकरही यासाठी सज्ज झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात एक महत्वाची मागणी करण्यात आली आहे. 22 जानेवारीला पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व मद्यविक्री तसेच मटण, चिकन, मासे शॉप दुकान बंद ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. संघर्ष सेनेतर्फे महापालिका आयुक्तांकडे ही मागणी करण्यात आली आहे.

22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. हा उत्सव देशभर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे 22 तारखेला देशामध्ये उत्साहाचं, आनंदी वातावरण रहावं. यामुळे सर्व मद्यविक्री तसेच मटण, चिकन, मासेविक्री दुकानं एका दिवसासाठी बंद ठेवावी अशी मागणी संघर्ष सेनेने पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा अधिकारी, पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पुण्यातून अयोध्येसाठी 30 जानेवारीपासून 15 विशेष रेल्वे गाड्या

हे सुद्धा वाचा

पुण्यातून अयोध्येसाठी 30 जानेवारीपासून 15 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. दोन दिवसाला एक गाडी पुण्यातून अयोध्येसाठी सुटणार आहे. त्यामुळे अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. अयोध्येला जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी भक्तांकडून केली जात होती, त्यानुसार रेल्वे प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने पुण्यातून 30 जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात 15 विशेष रेल्वे अयोध्यासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एका गाडीमध्ये साधारण दीड हजार प्रवासी अयोध्येला जाऊ शकणार आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.