जगातील सर्वात मोठी अगरबत्ती अयोध्येचं राम मंदिर सुगंधित करणार, कुठे तयार होतेय?

अगरबत्ती बनवण्यासाठी त्यांना सुमारे ३ ते ४ महिने इतका कालावधी लागला. या अगरबत्तीचे वजन ३५०० किलो आहे. अगरबत्तीची लांबी 108 फूट तर रुंदी साडे तीन फुट आहे. जगातील ही सर्वात मोठी अगरबत्ती आहे.

जगातील सर्वात मोठी अगरबत्ती अयोध्येचं राम मंदिर सुगंधित करणार, कुठे तयार होतेय?
worlds biggest agarbattiImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 2:22 PM

उत्तर प्रदेश | 19 डिसेंबर 2023 : अयोध्येमध्ये प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. 22 जानेवारी रोजी हा सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे प्रमुख यजमान आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशातील प्रमुख पुजारी, नेते यांना आमंत्रित करण्यात आलंय. प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबाबत देशभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या भव्य मंदिराच्या उभारणीत प्रत्येक रामभक्ताच्या मनात काही तरी अर्पण करण्याची इच्छा आहे. याच भावनेतून जोधपूरचे देशी तूप, कंबोडियाचे राज, थायलंडची हळद येथे पाठविण्यात आली आहे. यानंतर आता गुजरातच्या रामभक्तांनी रामलल्लाला अर्पण करण्यासाठी जगातील सर्वात मोठी अगरबत्ती बनविली आहे.

गुजरात येथील वडोदरा येथील कारागिरांनी ही प्रचंड अशी भली मोठी अगरबत्ती बनविली आहे. ही अगरबत्ती बनवण्यासाठी त्यांना सुमारे ३ ते ४ महिने इतका कालावधी लागला. या अगरबत्तीचे वजन ३५०० किलो आहे. अगरबत्तीची लांबी 108 फूट तर रुंदी साडे तीन फुट आहे. जगातील ही सर्वात मोठी अगरबत्ती आहे. ही अगरबत्ती रामलल्लाच्या चरणी अर्पण करणार आहे अशी माहिती कारागिरांनी दिली.

जगातील सर्वात मोठी अशी ही अगरबत्ती बनवण्यासाठी या कामगारांना ३ ते ४ महिने लागले. ही अगरबत्ती ४५ दिवस जळते. तसेच, त्याचा सुगंध 15 ते 20 किलोमीटर परिसरात पसरेल. त्यामुळे अयोध्येपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या राम भक्तांनाही या अगरबत्तीचा सुगंध घेता येणार आहे. थोडक्यात राम मंदिराचा परिसर गुजरातच्या सुगंधी अगरबत्तीने सुगंधित होणार आहे.

वडोदर येथे या अगरबत्ती बनविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. अगरबत्ती तयार करण्यासाठी गायीचे शुद्ध तूप वापरण्यात आले आहे. तसेच यात हवन साहित्याचा वापर करण्यात आला आहे. ही अगरबत्ती तयार करणाऱ्या गुजरातमधील बिहा ​​बाई या कारागिराने अयोध्येत भगवान श्री रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्यामुळे आम्ही ही अगरबत्ती बनविली आहे. यात अनेक सुगंधी घटक मिसळले आहेत. सुमारे तीन ते चार महिने आम्ही त्या अगरबत्तीवर मेहनत घेतली. ही अगरबत्ती रथातून अयोध्येला पाठवली जाईल अशी माहिती दिली.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी याला दुजोरा देताना सांगितले की, देशातील आणि जगातील सर्वच राम भक्तांना राम मंदिर ट्रस्टमध्ये काही तरी समर्पित करायचे आहे. प्रत्येक राम भक्ताची कल्पना असते की आपण राम मंदिर ट्रस्टला काहीतरी अर्पण केले पाहिजे जे इतरांपेक्षा वेगळे आहे. त्याच भावनेतून गुजरात येथील राम भक्तांनी ही 108 फूट लांब अगरबत्ती बनवली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.