Azadi Ka Amrit Mahotsav | सरदार उधम सिंग यांनी लंडनला जाऊन जालियनवाला बाग हत्याकांडाचा घेतला बदला, भगतसिंग होते आदर्श

Azadi Ka Amrit Mahotsav | जालियनवाला बाग हत्याकांडामुळे संपूर्ण देशात इंग्रजांविरुद्धचा संताप शिगेला पोहोचला होता, विशेषत: पंजाबच्या तरुणांनी या निर्घृण हत्याकांडाचा बदला घेण्याची शपथ घेतली होती. त्यापैकी एक तरुण सरदार उधम सिंग होते.

Azadi Ka Amrit Mahotsav | सरदार उधम सिंग यांनी लंडनला जाऊन जालियनवाला बाग हत्याकांडाचा घेतला बदला, भगतसिंग होते आदर्श
निडर सरदार उधमसिंगImage Credit source: TV9marathi
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 5:45 PM

Azadi Ka Amrit Mahotsav | 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड (Jallianwala Bagh massacre) घडले. त्यामुळे संपूर्ण देशात इंग्रजांविरुद्धचा (British) रोष शिगेला पोहोचला. विशेषत: पंजाबच्या तरुणांनी आणि क्रांतीकारकांनी  या निर्दयी हत्याकांडाचा बदला घेण्याची शपथ घेतली होती. यातील एक तरुण सरदार उधम सिंग (Udham Singh) हे होते. या घटनेने ते इतके संतप्त झाले की त्यांनी कर्नल रेजिनाल्ड डायर आणि पंजाबचे तत्कालीन गव्हर्नर मायकेल फ्रान्सिस ओडवायर यांना ठार मारण्याची शपथ घेतली. त्यांनी जालियनवाला बागेत निरपराध नागरिकांवर बेछुट गोळीबाराचा आदेश दिला होता. 21 वर्षांच्या प्रयत्नानंतर 1940 मध्ये मायकेल ओडवायरची हत्या करून त्यांनी शपथ पूर्ण केली. तोपर्यंत कर्नल रेजिनाल्ड डायरचा मृत्यू झाला होता. ओडवायरच्या हत्येनंतर उधम सिंग यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी स्वतःला अटक करवून घेतली. जालियनवाला हत्याकांडानंतर लोकांच्या मनातील रोषाला त्यांनी या बदल्यातून उत्तर दिलं.

पंजाबमधील सुनम येथे जन्म

सरदार उधम सिंह यांचा जन्म 28 डिसेंबर 1899 रोजी पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील सुनम या गावात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव तहल सिंह आणि आईचे नाव नारायण कौर होते. उधम सिंग यांचे मूळ नाव शेरसिंग होते. त्याच्या जन्मानंतर दोन वर्षांनी त्याच्या आईचे निधन झाले. काही वर्षांनंतर, 1907 मध्ये त्यांचे वडिल ही ईहीलोक सोडून गेले. यानंतर तो आपल्या भावासोबत एका अनाथाश्रमात राहत होते. जिथे त्यांना उधम सिंह हे नाव पडले.

हे सुद्धा वाचा

1919 मध्ये अनाथाश्रम सोडला

सरदार उधम सिंग यांच्या भावाचे 1917 मध्ये निधन झाले. यानंतर त्यांनी 1919 मध्ये अनाथाश्रम सोडला. त्याच काळात जालियनवाला बाग हत्याकांड घडले आणि त्यातील दोषींना मारण्याचा त्यांनी संकल्प केला. त्यासाठी ते ब्रिटिश भारतीय सैन्यात मजूर म्हणून दाखल झाले आणि परदेशात गेले.

अनेक देशांची सफर

परदेश दौऱ्यात सरदार उधम सिंग अनेक देशांमध्ये गेले. फ्रँक ब्राझील, उदय सिंग, उधन सिंग आणि मोहम्मद सिंग आझाद अशी अनेक नावे त्यांनी बदलली. उधम सिंग 1920 च्या सुरुवातीस गदर चळवळीत सामील झाले. तो लंडनस्थित वर्कर्स असोसिएशनमध्येही सहभागी झाले. 1927 मध्ये ते भारतात परत आले आणि बंदी असलेल्या साहित्यासह शस्त्रास्त्रांची त्यांनी तस्करी केली. त्या वर्षी 30 ऑगस्ट रोजी त्यांना अटक करण्यात आली आणि पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

पुन्हा 1934 मध्ये इंग्लंडमध्ये

तुरुंगातील चांगल्या वागणुकीमुळे सरदार उधम सिंग यांची एक वर्षांची शिक्षा कमी करण्यात आली. चार वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर 23 ऑक्टोबर 1931 रोजी त्यांची सुटका झाली, परंतु ते पोलिसांच्या रडारवर राहिले. तरीही त्यांनी छुप्या पद्धतीने क्रांतिकारी उपक्रम राबविले. दरम्यान, संधी मिळताच ते 1933 मध्ये जर्मनीला गेले आणि तिथून पुन्हा लंडनला पोहोचले आणि संयामाने ती संधी शोधू लागले ज्याची ते वर्षानुवर्षे वाट पाहत होते. लंडनमध्ये ते इंडियन वर्कर्स असोसिएशनमध्ये सहभागी झाले.

जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेतला

13 मार्च 1940 रोजी लंडनमधील रॉयल सेंट्रल एशियन सोसायटीत ईस्ट इंडिया असोसिएशनची बैठक सुरु होती. या बैठकीत त्यांनी मायकल ओडवायरवर पाच गोळ्या झाडल्या, त्यात तो जागीच ठार झाला. जालियनवाला बाग हत्याकांड घडले, तेव्हा डायर पंजाबचा तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर होता. जालियनवाला बाग हत्याकांडाचा आदेश देणारे रेजिनाल्ड डायरचा 1927 मध्ये मृत्यू झाला होता. अशा प्रकारे उधमसिंहांचा संकल्प पूर्ण झाला.

लंडन मध्ये फाशी

सरदार उधम सिंग यांच्यावर मायकल ओडवायरच्या हत्येचा खटला चालवला गेला, तुरुंगात असताना त्यांनी उपोषणही केले. त्यांना केंद्रीय फौजदारी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यांनी न्यायालयात दाखल केलेले अपील फेटाळण्यात आले. 31 जुलै 1940 रोजी भारतमातेचे वीरपुत्र उधम सिंग यांनी लंडनच्या तुरुंगात फासावर लटकवण्यात आले.

35 वर्षांनंतर अवशेष मायदेशी परत

फाशी दिल्यानंतर सरदार उधम सिंह यांचा मृतदेह तुरुंगात पुरण्यात आला. 1974 मध्ये पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री ग्यानी झैल सिंग यांनी अथक प्रयत्नांनी उधम सिंह यांचा अस्थी भारतात परत आणल्या. त्यांच्या अस्थिकलशाचे भारतात शहीद म्हणून स्वागत करण्यात आले. 2 ऑगस्ट 1974 रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि अनेक अस्थिकलश करण्यात आल्या. अस्थि गंगेत विर्सजीत करण्यात आल्या तर काही अस्थि कलश विविध धर्मियांकडे दफनविधीसाठी देण्यात आले. ते भगतसिंग यांना आदर्श मानत होते आणि त्यांचा फोटो त्यांच्या जवळ राहत असे.

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.