एका लग्नाची अजब गोष्ट, लग्नाला गेलेले वऱ्हाड रात्रभर थांबून नवरीशिवाय माघारी परतलं
आझमगड जिल्ह्यातील एका युवकाच्या लग्नासाठी वऱ्हाडासमोर नवरीच्या गावात पोहोचल्यानंतर वेगळचं आव्हान उभं राहिलं. Azamgarh groom bride marriage
लखनऊ: उत्तर प्रदेशातील आझमगडमधील एका लग्नाची गोष्ट चांगलीच चर्चेत आहे. आझमगड जिल्ह्यातील एका युवकाच्या लग्नासाठी वऱ्हाडी नवरीच्या गावात पोहोचले. यानंतर त्यांच्यासमोर वेगळचं आव्हान उभं राहिलं. लग्नासाठी नवरदेवासह वऱ्हाडी गावात पोहोचले पण नवरीचं घर काही सापडेना. सर्वांनी मिळून रात्रभर नवरी मुलगी आणि तिच्या घराचा शोध घेतला. पण, त्यांना यामध्ये यश आलं नाही.(Azamgarh groom searching house of bride return without marriage)
नवरी आणि तिचे कुटुंब रात्रभर शोधूनही न सापडल्याने नवरदेव आणि वऱ्हाड्यांना मोकळ्या हातानं माघारी फिरावं लागलं. आझमगडमधील कांशीराम कॉलनीतून वऱ्हाड मऊ जिल्ह्यातील रानीपूर येथे 10 डिसेंबरला गेले होते. लग्नाविना परत आल्यामुळं संतप्त झालेल्या नवऱ्यामुलाकडील नातेवाईकांनी यानंतर मध्यस्थ झालेल्या महिलेला ताब्यात घेतले. यानंतर प्रकरण थेट कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले. (Azamgarh groom searching house of bride return without marriage)
नवरदेवाच्या नातेवाईकांच्या माहितीनुसार हे लग्न नौरोलीमधील एका दुकानात ठरले होते. या ठिकाणी मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला आणि सर्व गोष्टी निश्चित करण्यात आल्या होत्या. लग्नाच्या दिवसांपर्यंत मुलाकडील कोणीही मुलीच्या गावी गेले नव्हते. लग्न ठरल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी नवरदेवाच्या नातेवाईकांकडून 20 हजार घेतले होते.
लग्नाच्या दिवशी वऱ्हाडी मंडळी रानीपूर गावात पोहोचली तेव्हा मुलगी आणि तिच्या नातेवाईकांचा पत्ता सापडला नाही. यांनंतर वऱ्हाडी मंडळींनी रात्रभर मुलीच्या कुटुंबाचा शोध घेतला. मात्र, त्यांना अपयश आलं आणि निराश होऊन वऱ्हांड्यांसह नवरदेवाला माघारी परतावं लागले. (Azamgarh groom searching house of bride return without marriage)
प्रकरण पोहोचलं पोलीस ठाण्यात
नवरी मुलगी आणि तिच्या कुटुंबाचा रात्रभर शोध घेऊनही ते सापडले नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या मुलाच्या नातेवाईकांनी मध्यस्थ झालेल्या महिलेला ताब्यात घेतले. यानंतर त्यांच्यात बराच वेळ वाद झाला. यानंतर हे प्रकरण कोतवाली पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. मात्र, या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आली नाही.
लेकीच्या लग्नात आईच झाली नवरी, आधी कन्यादान नंतर सात जन्माची गाठ!https://t.co/xFJW1s9sr8
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 14, 2020
संबंधित बातम्या
लेकीच्या लग्नात आईच झाली नवरी, आधी कन्यादान नंतर सात जन्माची गाठ!
लॉकडाऊन वाढल्याने लग्न लांबली, विदर्भातील हजारपेक्षा अधिक लग्न लांबणीवर
कोरोनाचा धसका, कोकणातील मुलींचा मुंबई आणि पुण्यातील मुलांसोबत लग्न करण्यास नकार
(Azamgarh groom searching house of bride return without marriage)