By Election Results 2022 : एक लोकसभा आणि चार विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल (By Election Results 2022) आज घोषित केले जातील. शनिवार, १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांच्यामुळे रिक्त झालेल्या बंगालच्या आसनसोल लोकसभेच्या जागेचाही समावेश आहे. याशिवाय छत्तीसगड, महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रत्येकी एका विधानसभेच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीचे निकालही येतील. बाबुल सुप्रियो यांनी गेल्या वर्षी आसनसोल लोकसभा मतदारसंघातून राजीनामा दिला होता. बाबुल सुप्रियो यांनी भारतीय जनता पार्टी (BJP) मधून तृणमूल काँग्रेस (TMC) मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आसनसोलच्या खासदारपदाचा राजीनामा दिला होता. त्याच वेळी, बालीगंगेचे प्रतिनिधित्व करणारे राज्यमंत्री सुब्रत मुखर्जी यांचे गेल्या वर्षी निधन झाले. या कारणांमुळे या दोन्ही जागांवर मतदान झाले. बालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत बाबुल सुप्रियो यांना आतापर्यंतच्या मतमोजणीत 13000 मते मिळाल्याचे समोर येत असून ते आघाडीवर असल्याचे कळत आहे.
दरम्यान, आसनसोल लोकसभा जागेसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. आसनसोलच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मतमोजणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या जागेवरून शत्रुघ्न सिन्हा आणि अग्निमित्रा पॉल यांच्यात चुरशीची लढत आहे. बालीगंगेमध्ये पहिल्या फेरीच्या मतमोजणीत टीएमसीचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांनी आघाडी घेतली होती. बाबुल सुप्रियो 9105 मतांनी आघाडीवर आहेत. बाबुल सुप्रियो यांना आतापर्यंतच्या मतमोजणीत 18874 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या कमरुझमान चौधरी यांना 3047, भाजपच्या काया घोष यांना 1744 आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सायरा शाह हलीम यांना 9769 मते मिळाली.
बाबुल सुप्रियो यांनी 2170 मतांनी आघाडीवर होती. बाबुल सुप्रियो भाजप सोडून गेल्या वर्षी टीएमसीमध्ये दाखल झाले. त्यानंतर आता बाबुल सुप्रियो यांना आतापर्यंतच्या मतमोजणीत 13000 मते मिळाल्याचे समोर येत असून ते आघाडीवर असल्याचे कळत आहे. तर याच्या आधी ते 4676 मतांनी आघाडीवर आहेत. तर काँग्रेसच्या कमरुझमान चौधरी यांना 2186, भाजपच्या काया घोष यांना 621 आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सायरा शाह हलीम यांना 5075 मते मिळाली. दरम्यान, या पोटनिवडणुकीत टीएमसीचे उमेदवार बाबुल सुप्रियो 6295 मतांनी आघाडीवर आहेत. बाबुल सुप्रियो यांना आतापर्यंतच्या मतमोजणीत 13000 मते मिळाली आहेत. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सायरा शाह हलीम यांना 6705 मते मिळाली.
आसनसोलमधून टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा 34430 मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीत शत्रुघ्न सिन्हा यांना 103089 मते मिळाली आहेत, तर भाजपच्या अग्निमित्र पाल यांना 68659 मते मिळाली आहेत. याशिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पार्थ मुखर्जी यांना 15977 मते मिळाली आहेत.
दरम्यान महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल ही हाती येत आहे. येथे काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना तेराव्या फेरीत 50807 मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना 39628 मते मिळाली. सध्या काँग्रेस आघाडीवर आहे. जयश्री जाधव 11 हजार 179 मतांनी आघाडीवर आहेत.