दिल्ली : पश्चिम बंगालमधलं राजकारण अवघ्या देशाला परिचीत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) आणि राज्यपाल जगदीप धनखड (governor jagdeep dhankhar) यांच्यामधील वाद असो वा पश्चिम बंगाल सरकार विरुद्ध केंद्र (Central Governement) संघर्ष असो, दोन्ही सरकारमधील मंत्र्यांमध्ये या न त्या कारणावरुन आरोप-प्रत्यारोप, टीका टिप्पणी सुरू असते. महाराष्ट्रासारखंच पश्चिम बंगालमध्येही केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष पहायला मिळतो. मात्र, मागच्या काही दिवसांपासून एका शपथविधीवरुन पश्चिम बंगालचं राजकारण ढवळून निघालंय. या शपथविधीची जोरदार चर्चाही आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) हे तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर कोलकाता येथील बालीगंगे मतदारसंघातून विधानसभा पोटनिवडणूक जिंकले आहेत. मात्र, त्यांना या विजयाच्या 25 दिवसांनी अखेर आमदार म्हणून शपथ घेता आलीय आणि शपथविधीचा वाद शमलाय.
अखेर शपथविधी झाला!
Kolkata | TMC leader Babul Supriyo took oath as MLA from the Ballygunge Assembly constituency yesterday, May 11
16 एप्रिलला बालीगंगे विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. बाबुल यांनी निकटतम प्रतिस्पर्धी सीपीआयच्या(एम) सायरा शाह हलीम यांचा 20 हजार 228 मतांनी तृणमूल काँग्रेसचे नेते बाबुल सुप्रियो यांनी पराभव केला. तृणमूलचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री सुब्रत मुखर्जी यांच्या आकस्मिक निधनामुळे बालीगंगेची जागा रिक्त झाली होती. राज्यपाल जगदीप धनखर यांच्याकडून परवानगी मागितली असता त्यांनी सभापती बिमन बॅनर्जी यांना घटनात्मक बंधनाचा हवाला देत बाबुल यांना शपथ देण्याची परवानगी दिली नाही. उपसभापतींवर ही जबाबदारी सोपवताना ते संविधानाच्या कलम 188 नुसार असल्याचं सांगितलं. याबाबत राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांच्यात मतभेद झाले. त्यामुळे शपथविधीवरुन वाद निर्माण झाला. या प्रश्नावर राज्यपालांनी मौन पाळलं. त्यानंतर उपसभापतींनी बाबुल यांना आमदार म्हणून शपथ दिली. बालीगंगे मतदारसंघातील मतदारांना आपला प्रतिनिधी निवडूनही त्यांच्या सेवेपासून वंचित ठेवलं जात असल्याचं सभापती बिमन बॅनर्जी यांनी सांगितलं होतं. हे लोकशाहीच्या हिताचं नसल्याचंही ते म्हणाले. यानंतर बाबुल सुप्रियो यांना सभापतींच्या विनंतीवरुन उपसभापतींनी शपथ दिली.
बाबुल सुप्रियो यांचं ट्विट
Thank you Ballygunge ??
Oath as a MLA administered by Honble Dy. speaker Ashish Banerjee in the presence of Honble Min Shri @itspcofficial •My sincere gratitude to Honble CM Didi @MamataOfficial for her support&Hon’ble Speaker Shri. Biman Bandopadhyay for his time & affection pic.twitter.com/54ahRgMuAH
तृणमूलचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री सुब्रत मुखर्जी यांच्या आकस्मिक निधनामुळे बालीगंगेची जागा रिक्त झाली होती. राज्यपाल जगदीप धनखर यांच्याकडून परवानगी मागितली असता त्यांनी सभापती बिमन बॅनर्जी यांना घटनात्मक बंधनाचा हवाला देत बाबुल यांना शपथ देण्याची परवानगी दिली नाही. उपसभापतींवर ही जबाबदारी सोपवताना ते संविधानाच्या कलम 188 नुसार असल्याचं सांगितलं. याबाबत राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांच्यात मतभेद झाले.