Balasore Train Accident : रेल्वे अपघाताला महिना झाला तरी 41 मृतदेहांची ओळख पटेना, आतापर्यंत सात रेल्वे अधिकाऱ्यांना जेलची वारी

ओदिशा रेल्वे अपघातात 293 जणांचा मृत्यू तर 1000 प्रवासी जखमी झाले होते. या अपघाताला इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींगला जबाबदार ठरविले गेले. नंतर हा तपासच सीबीआयकडे सोपविला गेला.

Balasore Train Accident  : रेल्वे अपघाताला महिना झाला तरी 41 मृतदेहांची ओळख पटेना, आतापर्यंत सात रेल्वे अधिकाऱ्यांना जेलची वारी
Odisha train accident balasore
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 1:59 PM

मुंबई : ओदिशाच्या बालासोर ( Balasore Train Accident ) जिल्ह्यातील तिहेरी रेल्वे अपघातात आधी तीन रेल्वे अधिकाऱ्यांना सीबीआयद्वारे अटक करण्यात आली नंतर आणखी चार अधिकाऱ्यांना अटक झाली. ड्यूटी दरम्यान हलगर्जीपणा दाखविल्याने या तीन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गु्न्हा दाखल केला होता. या अपघाताला महिना उलटला तरी अद्याप 41 मृतदेहांवर अंत्यसंस्कार होणे बाकी आहे. कारण त्यांची ओळख न पटविण्यासाठी घेतलेल्या डीएनए चाचण्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

बालासोर जिल्ह्यातील बहानगा रेल्वे स्थानकादरम्यान शुक्रवार 2 जून 2023 रोजी कोरोमंडळ एक्सप्रेस मालगाडीला धडकल्याने भीषण अपघात घडला होता. त्याच दुसऱ्या बाजूने यशवंतपूर एक्सप्रेस आल्याने तिचेही डब्बे घसरले. या अपघातात 293 जणांचा मृत्यू तर 1000 प्रवासी जखमी झाले होते. या अपघाताला आधी सिग्नल यंत्रणेतील दोष नंतर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींगला जबाबदार ठरविले गेले. नंतर हा तपासच सीबीआयकडे सोपविला गेला.

स्टेशन मास्तर आणि ट्रॅफीक इन्सपेक्टरवर कारवाई

बालासोर रेल्वे अपघाताची चौकशी सीबीआय करीत असून या प्रकरणात गेल्या 7 रोजी तीन रेल्वे अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर दाखविल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. आता कालच याप्रकरणात बहानगा रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर, बालासोरचे ट्रॅफीक इन्स्पेक्टर, सिग्नल टेक्निशियन आणि असिस्टंट डीव्हीजनल सिग्नल एण्ड टेलिकॉम इंजिनिअरचा समावेश आहे. चार अधिकाऱ्यांची नावे जाहीर केलेली नाहीत.

मृतदेहांची दुरावस्था 

बालासोर अपघाताच्या प्रकरणाचा तपास सीबीआयने आपल्या हातात घेतल्यानंतर 7 जुलै रोजी सीबीआयने सेक्शन इंजिनियर अरुण कुमार मोहंता, सेक्शन इंजिनियर मोहम्मद आमिर खान आणि टेक्निशियन पप्पू कुमार यांना 304 ( सदोष मनुष्यवध ) आणि 201 (पुरावे नष्ट करणे ) या आरोपाखाली अटक केली होती. या अपघातात एका बोगीतील प्रवाशांंचे मृतदेह जळाल्यासारखे दिसत असून त्यांना प्रचंड दाबाच्या वीजेच्या तारांमुळे शॉक लागला असावा असे म्हटले जात आहे. या मृतदेहांपैकी 41 मृतदेहांवर अंत्यसंस्कार झालेले नाहीत. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. त्यांच्या डीएनएचे नमूने त्यांच्या वारसांशी जुळतात का ? याची पाहणी केली जात आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.