दरवाजा, खिडक्या उघड्या ठेवून खुल्लम खुल्ला रोमान्स, शेजारीण परेशान, पोलिसात तक्रार करताच…
खुल्लम खुला प्यार करेंगे हम दोनो.. इस दुनिया से नही डरेंगे हम दोनो.. हे गाणं सर्वांनाच परिचित असेल. हे गाणं तर चित्रपटाचा एक भाग झालं, पण असं खरंच कोणी खुल्लम खुल्ला प्रेम व्यक्त करायला लागलं तर मात्र लोकांच्या नजरा लगेच बदलतात. असंच एक प्रकरण बंगळुरूमधून समोर आलं आहे.
बंगळुरू | 21 मार्च 2024 : खुल्लम खुला प्यार करेंगे हम दोनो.. इस दुनिया से नही डरेंगे हम दोनो.. हे गाणं सर्वांनाच परिचित असेल. हे गाणं तर चित्रपटाचा एक भाग झालं, पण असं खरंच कोणी खुल्लम खुल्ला प्रेम व्यक्त करायला लागलं तर मात्र लोकांच्या नजरा लगेच बदलतात. असंच एक प्रकरण बंगळुरूमधून समोर आलं आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. बंगळुरूच्या अवलाहल्ली येथे राहणाऱ्या महिलेने तिच्या शेजारी राहणाऱ्या जोडप्याविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. या जोडप्याच्या रोमँटिक नात्यामुळे आणि रोमान्समुळे ती महिला अतिशय त्रासली आहे. या महिलेने तिच्या खिडकीतून बाहेर पाहिल्यानंतर तिला समोरचं जोडपं रोमान्स करताना दिसलं, ज्यामुळे ती वैतागली आणि तिने सरळ गिरिनगर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली.
दक्षिण बंगळुरुच्या गिरिनगरच्या अवलाहल्ली येथे एक महिला राहते. खिडकी उघडून समोर पाहिल्यानंतर तेथील जोडपं रोमान्स करताना दिसतं, असं सांगत त्या महिलेने तक्रार दाखल केली. आपले शेजारी हे त्यांच्या घराची खिडकी उघडी ठेवून रोमान्स करतात असं तिचं म्हणणं आहे. यासंदर्भात तिने पोलिसांत तक्रार दाख केली. मात्र त्यानंतर संबंधित जोडप्याने त्या महिलेला धमकी दिली असा आरोपही तिने केला. आपण त्या जोडप्याल खिडकी लावून घेण्याचा सल्ला दिला. तेव्हा त्यांनी तिलाच खरंखोट सुनावलं, शिव्या दिल्या आणि बलात्कार, जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोपही महिलेने केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. जोडप्याच्या या वागण्याची आणि त्या महिलेच्या तक्रारीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.