Bank Opening Time: देशातील बँका आता एका तास आधीच सुरु होणार; सोमवारपासून 9 वाजता व्यवहार सुरु

या निर्णयाबरोबरच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून यूपीआयद्वारे पैसे काढण्याचा (cash withdrawal) परवानगीही देण्यात आली आहे. बँकेकडून देण्यात येणारी ही सुविधा पूर्णपणे कार्डलेस असणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करण्याचीही गरज नाही.

Bank Opening Time: देशातील बँका आता एका तास आधीच सुरु होणार; सोमवारपासून 9 वाजता व्यवहार सुरु
आरबीआयकडून बँक सुरु होण्याचा नवा नियमImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 11:43 PM

नवी दिल्लीः कोरोना महामारीनंतर अनेक महत्वाच्या संस्थांमधून आणि विभागातून वेगवेगळे नियम करण्यात आले तर काही नियम नव्यानेही केले आहेत. आताही रिझर्व्ह बँकेकडून (RBI) जुनाच पण नव्याने एक निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फायदा नोकरदार वर्गाबरोबरच अनेकांना होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने आता बँक (Bank) सुरु करण्याचा नवा निर्णय घेतला असून आधी पेक्षा आता एक तास अगोदरच बँकांचा व्यवहार सुरु होणार असल्याचे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे.

या आधी बँक सुरु होण्याची वेळ (Bank Timing) दहा वाजता असायची, आता ही वेळ बदलण्यात आली असून देशातील बँका आता सकाळा 9 वाजता सुरु होणार आहेत. कोरोनाच्या काळानंतर कामामध्ये चुकारपणा जाणवत आहेत.त्यामुळे बँकांना पूर्वपदावर आणण्यासाठी बँकांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

व्यवहार नऊ वाजता सुरु

देशातील बँकांचा व्यवहार करण्याची वेळ आता बदलण्यात येत असून सोमवारपासून एक तास आधीच आता उघडणार आहेत. या निर्णयामुळे 18 एप्रिलपासून ही वेळ लागू होणार आहे. सोमवारपासून बँका आता नऊ वाजता सुरु होणार आहेत, तर बँक व्यवहार बंद होण्याची वेळ मात्र जुनीच ठेवण्यात आली आहे. बँक आता एक तास आधीच उघडणार असून याबाबतच्या सूचना रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे बँक ग्राहकांना समाधान मिळणार आहे, कारण आता एक तास जादाचा वेळ यामुळे मिळणार आहे. याआधी बँका या दहा वाजता सुरु होत होत्या, मात्र आता सोमवारपासून 9 वाजता बँकांचे व्यवहार सुरु होणार आहेत.

नोकरदार वर्गाना समाधान

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे कार्यालयीन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समाधान मिळाले आहे. अनेक नोकरदार वर्गाना शनिवार किंवा रविवारी सुट्टी असते, मात्र यादिवशी ते बँकेतील कामं करु शकत नाहीत, कारण बँकांचेही शनिवारी अर्धा दिवसच व्यवहार चालू असतात. आरबीआयच्या या निर्णयामुळे ऑफिसला जाणारे जे कर्मचारी आहेत, ते बँकेतील काम करुन आपापल्या ऑफिसला जाऊ शकतात. कोरोना महामारी येण्याआधीही बँकांच्या वेळ ही 9 वाजताच होती. मात्र कोरोनाचे संकट वाढल्यानंतर या वेळेत बदल करण्यात आला आहे, त्या वेळेत बदल करुन 10 वाजता बँक सुरु करण्याचा निर्णय केला गेला होता. मात्र सध्या कोरोना महामारीतून देश बाहेर आल्याने बँकांचे व्यवहार सुरु होण्याची वेळ पहिल्यासारखीच करण्यात आली आहे.

यूपीआयद्वारे पैसे काढू शकणार

या निर्णयाबरोबरच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून यूपीआयद्वारे पैसे काढण्याचा (cash withdrawal) परवानगीही देण्यात आली आहे. बँकेकडून देण्यात येणारी ही सुविधा पूर्णपणे कार्डलेस असणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करण्याचीही गरज नाही. एटीएम आणि डेबिट कार्डमुळे होणाऱ्या घोटाळ्यामुळे कार्डलेस ट्रांजक्शनचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याद्वारे तुम्ही यूपीआयचा वापर करुन एटीएममधून पैसे काढू शकणार आहात.

संबंधित बातम्या

Bhayander Shivsena Dispute: मीरा भाईंदरमध्ये शिवसेना शहर प्रमुखाला महिला शिवसैनिकांकडून मारहाण

Mangesh Kudalkar : शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या, कारण अस्पष्ट; पोलीस तपास सुरु

Mosque Loudspeaker Issue : ‘छेडेंगे तो छोडेंगे नहीं’ म्हणत इशारा देणाऱ्या अब्दुल मतीन शेखानीचा शोध सुरु, मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...