एप्रिल महिन्यात 16 दिवस बँक राहणार बंद, पाहा सुट्ट्यांची यादी
एप्रिल महिन्यात वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये एकूण १६ दिवस बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असले, तर या सुट्ट्यांच्या दिवसांव्यतिरिक्त तुम्ही बँकेत जाऊ शकता

एप्रिल महिना सुरू झाला आहे. या महिन्यात खूप सुट्ट्या आहेत, ज्यामुळे या महिन्यात वेगवेगळ्या राज्यांमध्ये तब्बल १६ दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये 4 रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार सोडून १० दिवस वेगवेगळ्या ठिकाणी बँका बंद असतील. त्यामुळे जर तुम्हाला बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे करायची असतील लवकरात लवकर करुन घ्या. बँकांच्या या सुट्टीच्या दिवसांसोबत इतर दिवसांमध्ये काम पूर्ण करू शकता. एप्रिल महिन्यात तुमच्या राज्य किंवा शहरातील बँकांच्या सुट्ट्या कधी आहे, याची माहिती जाणून घेऊया.
एप्रिल महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी
- 1 एप्रिल – वार्षिक बँक क्लोजिंग (सर्व राज्यांमध्ये)
- 5 एप्रिल – बाबू जगजीवन राम जयंती (हैदराबाद-तेलंगणा)
- 6 एप्रिल – रविवार (सर्व राज्यांमध्ये)
- 10 एप्रिल – महावीर जयंती (सर्व राज्यांमध्ये)
- 12 एप्रिल – दुसरा शनिवार (सर्व राज्यांमध्ये)
- 13 एप्रिल – रविवार (सर्व राज्यांमध्ये)
- 14 एप्रिल – डॉ. आंबेडकर जयंती (सर्व राज्यांमध्ये)
- 15 एप्रिल – बांगाली न्यू इयर आणि बिहू (अगरतळा, गुवाहाटी, ईटानगर, कोलकाता आणि शिमला)
- 16 एप्रिल – बिहू (गुवाहाटी)
- 18 एप्रिल – गुड फ्रायडे (सर्व राज्यांमध्ये)
- 20 एप्रिल – रविवार (सर्व राज्यांमध्ये)
- 21 एप्रिल – गरिया पूजा (अगरतळा)
- 26 एप्रिल – चौथा शनिवार (सर्व राज्यांमध्ये)
- 27 एप्रिल – रविवार (सर्व राज्यांमध्ये)
- 29 एप्रिल – परशुराम जयंती (शिमला)
- 30 एप्रिल – अक्षय तृतीया (बंगळूर)
ऑनलाइन बँकिंगद्वारे करता येईल काम
बँकांच्या सुट्टीतही ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग आणि ATM सुविधांचा उपयोग करून त्यांच्या बँकिंग कामांची पारायण करता येणार आहे. या सुविधांवर बँकांची सुट्टी किंवा सार्वजनिक सुट्ट्यांचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे बँकिंग सेवांसाठी ग्राहकांना सुट्टीच्या दिवशीही व्यत्यय येणार नाही.
एप्रिल २०२५ मध्ये शेअर बाजार 11 दिवस बंद
एप्रिल २०२५ मध्ये शेअर बाजारातील व्यवहार ११ दिवस बंद राहतील. यामध्ये ८ दिवस शनिवार आणि रविवार असतील. याशिवाय, १० एप्रिल महावीर जयंती, १४ एप्रिल डॉ. अंबेडकर जयंती आणि १८ एप्रिल गुड फ्रायडे या सार्वजनिक सुट्ट्यांमुळेही शेअर बाजार बंद राहील. त्यामुळे शेअर बाजाराच्या गुंतवणूकदारांना त्यांचे नियोजन करताना या सुट्ट्यांचा विचार करणे आवश्यक आहे.