जानेवारीतील ‘या’ तारखांना बँका राहतील बंद, महत्वाची कामे करा लवकर

जानेवारी महिन्यात गुरु गोविंद सिंग यांचा जन्मदिवस, मकर संक्रांत, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती वगळता 4 रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवारी बँका बंद राहतील. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त बँकांना सुट्टी असली तरी यंदा हा दिवस रविवारी २६ जानेवारीला येत आहे. त्या व्यतिरिक्त बँक किती दिवस बंद राहणार आहेत ते जाणून घेऊयात.

जानेवारीतील 'या' तारखांना बँका राहतील बंद, महत्वाची कामे करा लवकर
जानेवारीतील 'या' तारखांना बँका राहतील बंदImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 2:03 PM

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2025 मधील बँकांच्या सुट्ट्यांची राज्यनिहाय यादी दरवर्षी प्रमाणे यंदाही जाहीर केली आहे. याशिवाय राज्यातील प्रमुख सणांच्या दिवशी होणाऱ्या सुट्ट्यांचाही उल्लेख आहे. मात्र, वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकेच्या सुट्ट्या बदलू शकतात. कारण जानेवारी महिन्यात गुरु गोविंद सिंग यांचा जन्मदिवस, मकर संक्रांत,असे अनेक सण येत असतात. त्याबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती तसेच शनिवार आणि रविवार पकडता असे मिळून एकुण १६ दिवस बँका बंद राहणार आहेत. दरम्यान प्रजासत्ताक दिनी बँकांना नेहमी प्रमाणे सुट्टी असते, मात्र यंदा प्रजासत्ताक दिवस हा रविवारी येत असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी तशीच राहणार आहे. म्हणजेच देशातील काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील, तर इतर राज्यांमध्ये बँका नेहमी सारख्या सुरू राहणार आहेत. या व्यतिरिक्त जानेवारी महिन्यात कोणत्या तारखेला बँका कुठे बंद राहणार आहेत हेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत चला जाणून घेऊयात.

जानेवारी बँक सुट्ट्या 2025

  • 1 जानेवारी 2025 रोजी आयझॉल, चेन्नई, गंगटोक, इंफाळ, इटानगर, कोहिमा, कोलकाता आणि शिलाँग मधील बँका नवीन वर्षाच्या दिवशी व लुसोंग किंवा नामसोंग येथे बंद राहतील.
  • 2 जानेवारी 2025 रोजी आयझॉल, गंगटोक या ठिकाणी लुसोंग आणि नामसंग दिवशी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बँका बंद राहतील.
  • 6 जानेवारी 2025 रोजी चंदीगडमध्ये श्री गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.
  • 11 जानेवारी ला मिशनरी डे/इमोइनू इरतापाच्या निमित्ताने आयझॉल आणि इम्फाळमध्ये बँका बंद राहतील.
  • 14 जानेवारी 2025 रोजी अहमदाबाद, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद (आंध्र प्रदेश), हैदराबाद (तेलंगणा), ईटानगर, कानपूर आणि लखनौ येथे मकर संक्रांत, उत्तरायण पुण्यकाळ, पोंगल, माघे संक्रांत, माघ बिहू, हजरत अली यांच्या वाढदिवसानिमित्त बँका बंद राहतील.
  • 15 जानेवारी 2025 रोजी चेन्नईत तिरुवल्लुवर दिनानिमित्त बँका बंद राहतील.
  • 16 जानेवारी 2025 रोजी उझावर थिरुनलच्या निमित्ताने चेन्नईत बँका बंद राहतील.
  • 23 जानेवारी 2025 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आणि वीर सुरेंद्रसाई जयंतीनिमित्त आगरतळा, भुवनेश्वर आणि कोलकाता मध्ये बँका बंद राहणार आहे.

ऑनलाइन, मोबाईल बँकिंग सेवांचा वापर करा

बँक बंद असतानाही डिजिटल बँकिंग अनेक प्रकारच्या सुविधा देत आहे. नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि अगदी व्हॉट्सॲप बँकिंगसह ऑनलाइन बँकिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यात आलेले आहेत हे विविध आर्थिक व्यवहारांसाठी सुरक्षित आणि कार्यक्षम प्रदान करतात. ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी हे प्लॅटफॉर्म मजबूत एन्क्रिप्शनचा वापर करतात. ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना बँकेची शाखा बंद झाल्यानंतरही बिल भरणे, निधी हस्तांतरण आणि खाते चौकशी सारख्या व्यवहारसुविधांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे तुम्ही बँक सुट्टीच्या दिवशी व्यवहार करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने मोबाईलच्या मदतीने व्यवहार करू शकता.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.