नवी दिल्ली : इत्तेहाद मिल्लत काउंसिलचे (आईएमसी) प्रमुख मौलाना तौकीर रजा खान यांनी देशात सुरु असलेल्या वेगवेगळ्या मुद्यांवर आपल मत मांडलय. त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. “बाबरी मशिदीला शहीद केलं. आता आणखी 3000 हजार मशिदींची यादी बनवलीय” असं तौकीर रजा म्हणाले. ASI, कोर्ट आणि सरकारवर विश्वास उरला नसल्याच तौकीर रजा म्हणाले.
तौकीर रजा यांनी आपल्या पत्रकार परिषदेत जेल भरो आंदोलन सुरु करण्यास सांगितलं. त्यांनी देशभरातील मुस्लिमांना साथ देण्याच अपील केलय. शुक्रवारी जेल भरो आंदोलन होईल. मौलान तौकीर रजा म्हणाले की, “देशातील मशिदींवर रोज बुलडोझर चालवला जातोय. ज्ञानवापीची परिस्थिती तुमच्या सगळ्यांसमोर आहे. पण अशा अनेक मशिदी तोडण्यात आल्या आहेत. म्हणून सगळ्या जगात देशातील कायदा बदनाम होत आहे”
3000 मशिदींची यादी तयार
“बाबरी मशिदीला शहीद केलं. पण ज्ञानवापीला शहीद होऊ देणार नाही. बाबरी मशिदीच्या बाबतीत बेईमानी केली. तेच आता ज्ञानवापीच्या बाबतीत होतय” असं तौकीर रजा म्हणाले. या दरम्यान मौलानाने मथुराच्या शाही ईदगाहच सुद्धा उल्लेख केला. त्यांनी सरकारवर आरोप करताना म्हटलं की, “हा सर्व 80/20 चा खेळ चाललाय. बाबरी आणि ज्ञानवापी शिवाय देशभरातील 3000 मशिदींची यादी बनवल्याच ते म्हणाले”
मानवतेच्या मारेकऱ्याला भारतरत्न
लालकृष्ण आडवाणींना भारत रत्न पुरस्कार देण्यावरही त्यांनी टीका केली. मानवतेच्या मारेकऱ्याला भारत रत्न पुरस्कार दिला असं ते म्हणाले. सीएए कायद्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं. सीएए लागू होणार आहे, हा मुस्लिमांच्या स्वातंत्र्यावर हल्ला आहे असं ते म्हणाले. सरकारी तंत्रावर विश्वास ठेवण हे स्वत:ला फसवण्यासारख आहे, असं ते म्हणाले. कुठल्याही चौकशी समितीवर विश्वास ठेऊ नका असं ते म्हणाले.