एका 65 वर्षीय वृद्ध महिलेचा आजारपणामुळे मृत्यू झाला. मृत्यूनंतर प्रथेनुसार या महिलेच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरु झाली. या महिलेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेण्यात आला. त्यावेळी तिथे एक चमत्कार घडला. महिलेच्या मृतदेहाला अग्नि देणार त्याआधी अचानक तिच्या शरीराची हालाचाल सुरु झाल्याच दिसलं. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले सगळेच जण घाबरले. सर्व जण सरणापासून लांब गेले. त्यावेळी महिला अचानक उठून उभी राहिली. हे पाहून लोक हैराण झाले. महिला जिवंत झाल्याचे पाहून तिच्या कुटुंबियांना आनंद झाला. तामिळनाडूच्या त्रिचीमधील ही घटना आहे.
मनाप्पराईच्या मारुंगापुरी येथील करुमलाई सुरंगमपट्टी गावातील हे प्रकरण आहे. पम्पैयान (72) आणि चिन्नाम्मल (65) हे वयोवृद्ध जोडपं एकत्र राहतं. कुटुंबातील अन्य सदस्य सुद्धा आसपासच राहतात. 16 नोव्हेंबरला दुपारी जेवताना चिन्नामल यांची तब्येच अचानक बिघडली. पती पम्पैयान घाबरले. ते कुटुंबातील अन्य सदस्यांच्या मदतीने पत्नी चिन्नाम्मला रुग्णालयात घेऊन गेले.
नस बंद झालेली
रस्त्यात चिन्नाम्मलाची तब्येत जास्त बिघडली. तिच्या शरीराची हालचाल बंद झाली. कुटुंबीय घाबरले. त्यांनी हाताची नस तपासली. नस बंद झालेली. महिला श्वास घेत नव्हती. कुटुंबियांना वाटलं तिचा मृत्यू झालाय. म्हणून ते महिलेला परत घरी घेऊन आले. महिलेच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु होती.
चितेवर लाकडं ठेवण्यात आली
घरच्या लोकांनी केस काढले. पंडित बोलावला, सर्व विधी पूर्ण केले. त्यानंतर मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी स्मशानात गेले. नातेवाईकांसह गावकरी सुद्धा स्मशानात आले होते. चितेवर लाकडं ठेवण्यात आली. नातेवाईकांनी चितेवर ठेवण्याासठी महिलेचा मृतेदह उचलताच हालचाल दिसून आली. ते पाहून लोक घाबरले.
समोरच दृश्य पाहून ती सुद्धा चक्रावली
अचानक महिला उठली. तिने हात-पाय हलवले. सरणावरुन उठून बसली. समोरच दृश्य पाहून ती सुद्धा चक्रावली हे काय चालू आहे. त्यानंतर लोकांनी तिला काय झालं ते सांगितलं. ही घटना संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनली आहे.