Loksabha Election 2024 | निवडणुकीआधी BJP ची नवीन टीम घोषित, महाराष्ट्रातून दोन महिला नेत्या बनल्या राष्ट्रीय सचिव

| Updated on: Jul 29, 2023 | 11:52 AM

Loksabha Election 2024 | महाराष्ट्रातून दोन महिला नेत्यांची राष्ट्रीय सचिवपदी निवड झाली आहे. AMU चे माजी VC तारिक मंसूर यांना भाजपा उपाध्यक्ष बनवण्यात आलय.

Loksabha Election 2024 | निवडणुकीआधी BJP ची नवीन टीम घोषित, महाराष्ट्रातून दोन महिला नेत्या बनल्या राष्ट्रीय सचिव
Modi-nadda
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. पार्टीने राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय सह संघटन महामंत्री, राष्ट्रीय सचिव आणि कोषाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केंद्रीय पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केलीय. यात 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि 8 राष्ट्रीय महामंत्री आहेत. बीजेपीने 13 पैकी दोन मुस्लिम नेत्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवल आहे. अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटीचे माजी वाइस चांसलर तारिक मंसूर यांना भाजपा उपाध्यक्ष बनवलं आहे. केरळचे अब्दुल्ला कुट्टी आधीपासूनच भाजपा उपाध्यक्ष आहेत.

भाजपाने बीए एल संतोष यांना राष्ट्रीय महामंत्री (संघटना) बनवलं आहे. या लिस्टमध्ये पक्षाच्या 13 राष्ट्रीय सचिवांची नावे आहेत. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना केंद्रीय संघटनेत जबाबदारी मिळाली आहे. त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आलं आहे.

राष्ट्रीय उपाध्यक्ष कोण?

मध्य प्रदेशचे सौदान सिंह यांना राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या यादीत स्थान मिळालं आहे. उत्तर प्रदेशातून येणारे तारिक मंसूर यांच्याशिवाय खासदार लक्ष्मीकांत बाजपाई आणि रेखा वर्मा यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवलं आहे. झारखंडचे माजी सीएम रघुबर दास यांना भाजपाच नवीन राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आलं आहे.


महाराष्ट्रातून दोन महिला नेत्यांना संधी

केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या लिस्टमध्ये भाजपाने 13 राष्ट्रीय सचिवांच्या नावाची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातून पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांची नाव आहेत. आंध्र प्रदेशातून सत्या कुमार, दिल्लीतून अरविंद मेनन, पंजाबमधून नरेंद्र सिंह रैना, राजस्थानातून अल्का गुर्जर, पश्चिम बंगालमधून अनुपम हाजरा, मध्य प्रदेशातून ओमप्रकाश धुर्वे, बिहारमधून ऋतुराज सिन्हा, झारखंडमधून कामख्या प्रसाद तासा, उत्तर प्रदेशातून सुरेंद्र सिंह नागर आणि केरळमधून अनिल एंटनी यांना राष्ट्रीय सचिव बनवण्यात आलं आहे.