Agnipath Scheme Protest :अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात आंदोलक आक्रमक, रेल्वे पेटवल्या
आज सकाळी उत्तर प्रदेशातील बलिया येथे तरुणांनी जोरदार निदर्शने केली. त्यापैकी काही आक्रमक झालेल्या तरूणांनी रेल्वे स्थानकात सुरूवातीला गोंधळ घातला. त्यानंतर संबंधित ट्रेन पेटवून दिली आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या (Central Government) नव्या अग्निपथ योजनेविरोधात (Agnipath Scheme) तरुणांचा रोष वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उत्तरप्रदेशसह बिहार (Bihar) राज्यातील रेल्वे आणि सरकारी मालमत्ताचे तरुणांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. काल झालेल्या तोडफोडीनंतर आज सकाळापासून तरुण आंदोलकांनी गाड्या टार्गेट केल्या आहेत. विशेष म्हणजे उत्तरप्रदेशच्या बलियामध्ये आंदोलकांनी पहाटे रेल्वे स्थानकाची पहिल्यांदा तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी रेल्वे पेटवून दिली आहे. बिहारमधील आरा, लखीसराय, सुपौल या भागात गाड्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. आत्ता देशातील अनेक ठिकाणी आंदोलन केलं आहे. त्याचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. अग्निपथ योजनेचा फज्जा उडाला असून याबाबत सरकारला चांगला निर्णय घ्यावा लागेल अशी शक्यता आहे.
#WATCH | Bihar: Agitators protested against #AgnipathScheme, at Hajipur railway station today; they were later chased away by Police.
हे सुद्धा वाचा“Situation at the moment is alright. Hooligans have been chased away. Some of them have been detained for questioning,” says SP Hajipur, Maneesh. pic.twitter.com/W1FnrXqDzj
— ANI (@ANI) June 17, 2022
यूपीच्या बलियामध्ये हिंसक आंदोलन
आज सकाळी उत्तर प्रदेशातील बलिया येथे तरुणांनी जोरदार निदर्शने केली. त्यापैकी काही आक्रमक झालेल्या तरूणांनी रेल्वे स्थानकात सुरूवातीला गोंधळ घातला. त्यानंतर संबंधित ट्रेन पेटवून दिली आहे. ज्यांचा अग्निपथ योजनेला विरोध आहे, अशा तरूणांनी आज सकाळी रेल्वे स्थानकात प्रचंड गोंधळ घातल आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून काही तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बिहारमधील आक्रमक तरूणांनी विक्रमशिला एक्स्प्रेस जाळली
अग्निपथ योजनेचे पडसाद देखील बिहारमध्ये उमटले आहेत. तिथं काही आंदोलकांनी अग्निपथ योजनेला प्रखर विरोध केला. तसेच उभ्या असलेल्या विक्रमशिला एक्स्प्रेसला त्यांनी आग लावली. रेल्वे स्थानकातही तोडफोड केल्याने मोठा गोंधळ उडाला होता. अग्निपथ योजना’ मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी सरकारकडे केली आहे.
बिहारच्या बेतिया स्थानकावर विद्यार्थ्यांचे आंदोलन
शुक्रवारी सकाळी पश्चिम चंपारणमधील बेतिया रेल्वे स्थानकावर विद्यार्थ्यांचे आंदोलन आक्रमक झाले. विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यामुळे मोठ्या संख्येने प्रवासी नाराज झाले नाराज झाल्याची माहिती मिळाली आहे. तिथंही आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याने त्यांनी रेल्वे पेटवली. तरूण आंदोलक आक्रमक असून सरकारने निर्णय मागे घ्यावा यासाठी आंदोलन करीत आहेत. तेलंगणामधील सिंकदाराबाद स्टेशनमध्ये उभ्या असलेल्या ट्रेनला आंदोलकांनी आग लावली. तिथंही आंदोलक आक्रमक झाल्याचं समजतंय. हरियाणामध्ये देखील आक्रमक तीन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.