नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी आता पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा, वकिलांसह लोकांनी आरोपीला धू धू धुतला

Jayesh Pujari Pakistan : खटल्यासाठी आणलेल्या आरोपी जयेश पुजारीने न्यायालयाच्या आवारातच पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. उपस्थित वकील आणि लोकांनी त्याची चांगलीच धुलाई केली. पोलिसांनी त्याचा कसाबसा मारहाणीतून जीव वाचवला.

नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी आता पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा, वकिलांसह लोकांनी आरोपीला धू धू धुतला
वकील, लोकांनी धू धू धुतला
Follow us
| Updated on: Jun 12, 2024 | 4:39 PM

खटल्यासाठी आणलेल्या एका कैद्याने बुधवारी सकाळी बेळगाव न्यायालयाच्या आवारात पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्या. त्यामुळे खवळलेल्या वकील आणि लोकांनी त्याची चांगलीच धुलाई केली. त्याला जबरी मार बसला. पोलिसांनी त्यांची लोकांच्या गराड्यातून त्याला बाजूला खेचले. अनेकांनी त्याच्या कानशिलात वाजवली. तर काहींनी त्याला जोरदार प्रसाद दिला. यामुळे कोर्ट परिसरात एकच गोंधळ उडाला. त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. जयेश पुजारी असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि एका आयपीएस अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. एका प्रकरणात त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. सुनावणी झाल्यानंतर न्यायालयीन कक्षाच्या बाहेर येताच त्यानं पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

जयेश पुजारी अनेक गुन्ह्यात

हे सुद्धा वाचा

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैदी जयेश पुजारी हा विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेला आहे. त्याला सुनावणीसाठी आज सकाळीच न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर ‘कोर्टात माझी तक्रार स्वीकारली जात नाही’ असा तक्रारीचा पाढा त्याने वाचला. त्यानंतर त्याने एकाएक पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्या. उपस्थित लोकांनी आणि वकिलांचा राग अनावर झाला. त्यांनी त्याची चांगलीच धुलाई केली. त्याला लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला. लोकांच्या तावडीतून पोलिसांनी त्याला सोडवले आणि एपीएमसी स्थानकात नेते. तिथे त्याची चौकशी करण्यात आली.

यापूर्वी गडकरींना धमकी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवरून धमकी दिली होती. जयेश पुजारी याने यापूर्वी तुरुंगात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आयपीएस अधिकारी आलोक कुमार यांना धमक्या दिल्या होत्या. सहा महिन्यांपूर्वी त्याने हा प्रकार केला होता. याप्रकरणात त्याची चौकशी सुरु आहे.

लोखंडी तार गिळण्याचा प्रयत्न

जयेश हा कारनामेखोर असल्याचे समोर आले आहे. त्याने यापूर्वी तुरुंगात लोखंडी तार गिळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तुरुंगात त्याच्यावर देखरेख ठेवण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानंतर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्यात त्याच्या पोटात वायरचे तुकडे आढळल्याचे समोर आले होते. तर डॉक्टरांनी तो तंदुरुस्त असल्याचे जाहीर केले होते.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.