बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक रिंगणात 10 उमेदवार, ‘हे’ मराठी नेते आमनेसामने

बेळगाव लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात 10 जण आहेत. बेळगाव लोकसभेसाठी एकूण 23 जणांनी 33 उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक रिंगणात 10 उमेदवार, 'हे' मराठी नेते आमनेसामने
EVM Machine
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 12:08 AM

बेळगाव : बेळगाव लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात 10 जण आहेत. बेळगाव लोकसभेसाठी एकूण 23 जणांनी 33 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्जमाघारीच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या के. पी. पाटील यांच्यासह 8 जणांनी अर्ज माघार घेतले आहेत. त्यामुळे सध्या निवडणुकीच्या रिंगणात 10 जण आहेत. काँग्रेसतर्फे सतीश जारकीहोळी आणि भाजपतर्फे मंगला अंगडी निवडणूक लढवत आहेत. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना चिन्हावरील आक्षेपानंतरही ‘सिंह’ हेच निवडणूक चिन्ह मिळाले आहे (Belgaum Lok Sabha by poll list of 10 candidate in election Marathi).

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहेय. यासाठी 18 लाख 13 हजार 538 मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. अर्थात उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या तारखेपर्यंत झालेली मतदार नोंदणी ही मतदानासाठी पात्र ठरणार आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण 18 लाख 13 हजार 538 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार 9 लाख 11 हजार 25 असून महिला मतदार 9 लाख 2 हजार 455 आहेत. इतर मतदारांची संख्या 58 आहे. उमेदवारी अर्ज माघार घेऊन झालेली मतदार नोंदणी मतदानासाठी पात्र असणार आहेत.

बॅलेटवर भाजप उमेदवार पहिल्या, काँग्रेस दुसऱ्या तर समिती उमेदवार नवव्या क्रमांकावर

बॅलेटवरील नावांचा क्रम निश्चित करताना राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष, नोंदणीकृत अमान्यता पक्ष आणि आद्याक्षरानुसार अपक्ष उमेदवार असा लावला जातो. त्यानुसार बेळगाव मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मंगला अंगडी यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असेल. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांचे नाव ईव्हीएम मशीनवरील बॅलेट पेपरवर 2 नंबरवर, तर युवा समितीचे उमेदवार शुभम शेळके यांचे नाव 9 नंबरवर येणार आहे.

10 उमेदवारांचा ईव्हीएम मशीनवरील बॅलेट पेपरवर नंबर

1. मंगला अंगडी (भाजप) – कमळ 2. आमदार सतीश जारकीहोळी (काँग्रेस) – हात/पंजा 3. विवेकानंद बाबू घंटी (कर्नाटक राष्ट्र समिती) – शिट्टी 4. व्यंकटेश्वर महास्वामीजी (हिंदुस्थान जनता पार्टी) – ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी 5. सुरेश बसाप्पा मरीलिंगण्णावर (कर्नाटक कामगार पक्ष) – ऑटो रिक्षा 6. अप्पासाहेब कुरणे (अपक्ष) – कप बशी 7. गौतम यमन्नाप्पा कांबळे (अपक्ष) – पंचिंग मशिन 8. नागप्पा कळसन्नवर (अपक्ष) – गॅस सिलेंडर 9. शुभम शेळके (युवा समिती/अपक्ष) – सिंह 10. श्रीकांत पडसलगी (अपक्ष) – प्रेशर कुकर

हेही वाचा : 

Belgaum by-election | भाजपची नवी खेळी, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी लिंगायत धर्मगुरुंसोबत खासगी बैठक, समीकरणं बदलणार ?

काँग्रेसला जिंकवण्यासाठी राऊतांकडून महाराष्ट्र एकीकरण समितीची दिशाभूल : निलेश राणे

महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके जिंकणार का?, काय आहे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचं गणित?; वाचा सविस्तर

व्हिडीओ पाहा : 

Belgaum Lok Sabha by poll list of 10 candidate in election Marathi

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.