कोण आहेत निकीता सिंघानिया ? ज्यांना सोशल मीडियावर का ट्रोल केले जात आहे ?

पती आणि पत्नीच्या संसारात भांड्याला भांडे तर लागतच असते. परंतू दोघांनी एकमेकांना समजून घेत चुकले तर सॉरी म्हणत जीवन जगायचे असते. परंतू जेव्हा हे भांडण कोर्ट - कचेरी आणि पोलिस ठाण्यात पोहचते तेव्हा सर्व गोष्टी हाताबाहेर गेलेल्या असतात.

कोण आहेत निकीता सिंघानिया ? ज्यांना सोशल मीडियावर का ट्रोल केले जात आहे ?
Follow us
| Updated on: Dec 11, 2024 | 1:27 PM

बंगळुरुचे एआय इंजिनियर अतुल सुभाष यांनी पत्नीच्या छळाला कंटाळुन आपले जीवन संपवल्याने सोशल मीडियावर हंगामा झाला आहे. त्यांचे २४ पानांचे सुसाईड नोट सोश ल मीडियावर व्हायरल झाले आहे. ते वाचून लोकांना धक्का बसला आहे. या इंजिनिअरची पत्नी निकीता सिंघानिया यांच्या विरोधात अनेकांनी संताप व्यक्त करीत त्यांना जबरदस्त ट्रोल केले जात आहे. काय आहे हे नेमके प्रकरण पाहूयात…

सोशल मीडियावर मंगळवारी सायंकाळी निकीता सिंघानिया नावाच्या महिलेच्या नावाने युजर्सनी आपला संताप व्यक्त केला आहे. एक्स प्लॅटफॉर्मवर ( आधीचे ट्वीटर ) हॅश टॅग #NikitaSinghania नावाने ट्रेंड सुरु असून युजर्सच्या कमेंटचा पाऊस पडला आहे. लोक या महिलेला ट्रोल करीत आहेत आणि संताप व्यक्त करीत आहेत. ज्याला जे वाटेल ते मत त्यांच्याबद्दल लिहीले जात आहेत. अखेर कोण आहेत या निकीता सिंघानिया ज्यांना एवढे ट्रोल केले जात आहे.

हे सुद्धा वाचा

येथे पोस्ट पाहा –

२४ पानांचे पत्र लिहून इंजिनियरने जीवन संपवले

अतुल सुभाष यांनी आपले जीवन संपवताना २४ पानांचे पत्र लिहीले आहे. ज्यात त्यांनी पत्नीने कसा छळवाद मांडला याची कहाणी कथन केली आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.त्यावर प्रतिक्रीयांचा अक्षरश: पाऊस पडला आहे. एक्स मायक्रो ब्लॉगिंग साईटवर #NikitaSinghania, #JusticeForAtulSubhash, #Divorce आणि #Dowry सारखे शब्द ट्रेंडींग मध्ये आहेत. इंजिनियर सुसाईड प्रकरणात लोक निकीता यांच्यावर खूपच नाराज झाले आहेत. आणि मनात येईल ते कमेंट्स करीत आहेत,

निकीता नऊ केस दाखल केल्या होत्या

उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे राहाणाऱ्या निकीता यांनी त्यांचे पती सुभाष यांच्या विरोधात एकूण नऊ केस दाखल केल्या होत्या. असा आरोप होत आहे की सेटलमेंटच्या नावाखाली निकीता तीन कोटी रुपयांची मागणी करीत होती. या दोघांची भेट साल २०१९ मध्ये एका मॅट्रिमोनियल साईटवर झाली होती. त्यानंतर दोन वर्षांनी दोघांनी विवाह केला. निकीता दिल्ली राहून जॉब करत होत्या. त्या एसेंचर कंपनीत कामालाा होत्या. या प्रकरणानंतर एसेंचर कंपनीने आपले एक्स अकाऊंट प्रोटेक्ट केले आहे.म्हणजे कोणी त्यांना टॅग करायला नको याची तरतूद केलेली आहे. सुभाष एआय इंजिनियर होते. ते कंपनीच उप महाव्यवस्थापक होते. एवढ्या चांगले आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीला पत्नीच्या छळाने जीवन संपवावे लागल्याने लोकांना धक्का बसला आहे.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.