बेंगळुरूः बिहारमधील इलेक्ट्रिशियन, जो बेंगळुरूमध्ये (Bengaluru) राहत होता, त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत लैंगिक संबंध (physical relation) ठेवण्यास नकार दिला म्हणून त्याने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह शिराडी घाटात फेकून दिला होता. त्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने नंतर एक गोष्ट रचली आणि आपली पत्नी बेपत्ता (Wife missing) झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. बेंगळुरूमध्ये घडलेल्या या धक्कादायक गुन्ह्यातील संशयित आरोपीचे नाव आहे पृथ्वीराज सिंग (Prithviraj Singh) असून त्याने नऊ महिन्यांपूर्वीच ज्योती कुमारीसोबत लग्न केले होते. लग्नानंतर मात्र आपल्या पत्नीने तिच्या वयाबद्दल आपल्याला खोटे सांगितल्याचा राग त्याच्या मनात होता. त्या दोघांमध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद होत होते, त्यामुळे पत्नीने त्याच्याबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासही देत नेहमी नकार देत होती.
लग्नाच्या वेळी तिने नवऱ्याकडच्या कुटुंबीयांना सांगितले होते की ती 28 वर्षांची आहे, मात्र नंतर तिचे खरे वय हे 38 असल्याचे समजल्यानंत आणि दहा वर्षाचा फरक असल्याचे समजल्यानंतर मात्र त्यांच्यामध्ये नेहमीच वाद होत होते.
या दोघांच्या लग्नानंतर तिने त्याच्यासोबत कधीही शरीरसंबंध ठेवण्यास सहमती दर्शवली नव्हती. लग्नातही मानापमानाच्या गोष्टीमुळे आणि पत्नीच्या या वयाच्या गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये नेहमीच वाद होत होते. लग्नानंतर आपल्या आईवडिलांचा अपमान करत असल्याचेही सिंगने पोलिसांना सांगितले.
कौटुंबीक वाद वाढत गेल्यानेच संतापलेल्या सिंगने ज्योतीला संपवण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर त्याने बिहारमधील आपला मित्र समीर कुमारला पत्नीचा काटा काढण्यासाठी बोलवून घेतले. त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी दोघे उडापीला गेले, तेथे त्यांनी ज्योतीची गळा आवळून तिची हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह शिर्डी घाटात फेकून दिला. पत्नीचा खून करुन घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने पोलिसांत पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
याप्रकरणात सिंगने पोलिसांना सांगताना एक गोष्ट रचली होती, त्याने पोलिसांना सांगितले की, ज्योती अनेक वेळा घरातून न सांगताच निघून जायची आणि नंतर स्वतःच ती परत यायची. मात्र यावेळी तिचा मोबाईल बंद असल्याने तो तिचा शोध घेऊ शकला नाही असं त्याने पोलिसांना स्पष्टपणे सांगितले.
मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चालू केल्यानंतर मात्र सिंगच्या कारनामा उघडा पडला. आणि सिंगवर पोलिसांचा संशय बळावला, त्यामुळे कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी पत्नीच्या हत्याप्रकरणी अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर पत्नीची हत्या करून कुठे टाकलेले हे सांगितल्यानंतर पोलिसांनी कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह दरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.