सावधान! वेगाने पसरणारा कोरोनाचा विषाणू आढळला, बाधित रुग्ण सापडले, देशात चिंतेचे सावट
JN.1 विषाणू जलदगतीने आपले हातपाय पसरवित आहे. या विषाणूमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. तसेच, कोरोनाच्या पूर्वीच्या प्रकारांपेक्षा हा विषाणू वेगळा आहे.
केरळ | 16 डिसेंबर 2023 : देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोविडचा सबव्हेरियंट असलेल्या BA.2.86 च्या जातीतील भयंकर असा विषाणू केरळचा काही भागात आढळून आला आहे. वर्षभराच्या अंतरानंतर भारतात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत ही देशासाठी चिंतेची बाबा ठरत आहे. पूर्वी कोरोनाची लागण झालेल्या आणि लसीकरण केलेल्या लोकांनाही या विषाणूची बाधा होऊ शकते, अशी माहिती नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड टास्क फोर्सचे सह अध्यक्ष राजीव जयदेवन यांनी दिली आहे.
नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड टास्क फोर्सचे सह अध्यक्ष राजीव जयदेवन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोविडचा सबव्हेरियंट असलेल्या बीए 2.86 जातीतील JN.1 हा विषाणू केरळच्या काही भागांत आढळून आला आहे. हा विषाणू केरळमध्ये वेगाने पसरत आहे असेही त्यांनी सांगितले.
The India SARS-CoV-2 Genomics Consortium या प्रयोगशाळेने हा विषाणू शोधला. नोव्हेंबरमध्ये हा विषाणू आढळला. केरळमध्ये हा विषाणू पहिल्यांदा आढळला. JN.1 विषाणू जलदगतीने आपले हातपाय पसरवित आहे. या विषाणूमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. तसेच, कोरोनाच्या पूर्वीच्या प्रकारांपेक्षा हा विषाणू वेगळा आहे. परंतु, पूर्वीसारखी तीव्रता यामध्ये नाही अशी माहितीही त्यांनी दिली.
कोरोना काळात ज्यांनी तिन्ही लस घेतल्या आहेत अशा व्यक्तीनांही JN.1 विषाणूपासून धोका निर्माण होऊ शकतो. JN.1 विषाणू बाधित काही रुग्ण केरळमध्ये सापडले आहेत. तसेच, JN.1 विषाणू वेगाने पसरू नये यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना गंभीर आजार झाला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेमध्ये सप्टेंबर 2023 मध्ये जेएन 1 हा विषाणू पहिल्यांदा आढळला होता अशी माहितीही त्यांनी दिली.