कोरोनाविरोधी लढ्यासाठी ‘भैरवा’ पेंटिंगचा लिलाव, सदगुरुंचा पुढाकार
सदगुरु यांनी कोरोना लढ्यासाठी निधी उभारण्यासाठी आपल्या भैरवा या पेंटिंगचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे (Auction of Bhairava Painting of Sadhguru).
कोईंबतूर : इशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरु यांनी कोरोना लढ्यासाठी निधी उभारण्यासाठी आपल्या भैरवा या पेंटिंगचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे (Auction of Bhairava Painting of Sadhguru). तामिळनाडूला कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर इशा फाऊंडेशनने तामिळनाडूच्या ग्रामिण भागात कोरोना मदत कार्याला सुरुवात केली. यासाठी निधी उभा करण्यासाठी या पेंटिंगचा लिलाव करण्याची घोषणा केली. ही पेंटिंग नैसर्गिक गोष्टींचा उपयोग करुन तयार करण्यात आली आहे. यात शेण, कोळसा, हळद, चुनखडी यांचा उपयोग करण्यात आला आहे.
तामिळनाडूत कोरोना संसर्गाने थैमान घातलं आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांवर अगदी उपासमारीची वेळ आली आहे. त्यांनाच मदत म्हणून इशा फाऊंडेशन मदतकार्य करत आहे. यासाठी निधी उभा करण्यासाठी सदगुरु यांनी आपल्या आवडत्या बैलाचं काढलेलं पेंटिंग लिलावासाठी खुलं केलं आहे. या बैलाचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू लॉकडाऊनमध्येच मृत्यू झाला होता. तो आजारी होता, मात्र डॉक्टर उपलब्ध होऊ न शकल्याने त्याच्यावर वेळेवर उपचार होऊ शकले नव्हते. यानंतर सदगुरु यांनी त्याच्या आठवणीत त्याचं पेंटिंग काढलं होतं.
इशा फाऊंडेशनने याबाबत एक व्हिडीओ देखील रिलिज केला आहे. यात स्वतः सदगुरु शेणाचा आणि इतर गोष्टींचा उपयोग करुन हे पेंटिंग काढताना दिसत आहेत. सदगुरु या बैलाला सर्वात देखणा बैल म्हणतात. तसेच त्याच्या इतका देखणा बैल कुठेही पाहायला मिळणार नाही, असंही नमूद करतात. या भैरवी पेंटिंगचा ऑनलाईन पद्धतीने लिलाव केला जाणार आहे. त्यामुळे यासाठी बोल्याही ऑनलाईनच येणार आहेत. बोली लावण्याची अंतिम तारीख 5 जुलै निश्चित करण्यात आली आहे.
इशा फाऊंडेशनने तामिळनाडूच्या ग्रामीणभागात उपासमार होत असलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. सोबतच जे वैद्यकीय कर्मचारी आघाडीवर राहून कोरोना नियंत्रणाचं काम करत आहेत त्यांनाही साधनसामुग्रीची मदत केली जात आहे. नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून काही औषधांचंही वाटप केलं जात आहे. सदगुरु यांनी उपासमारीतील लोकांना मदत करण्यासाठी याआधी देखील एक पेंटिंग विकलं होतं. हे त्यांचं दुसरं पेटिंग आहे.
हेही वाचा : Melghat Superstition | आता 26 दिवसांच्या बाळाच्या पोटावर गरम सळईचे चटके, मेळघाटात अंधश्रद्धेचा कहर
राजू शेट्टींच्या विधानपरिषदेचा मार्ग मोकळा, स्वाभिमानीतील वाद मिटला
Auction of Bhairava Painting of Sadhguru