नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात नवी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला चार महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चाने ‘भारत बंद’चं आवाहन केलं आहे. या आवाहनाला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या माहितीनुसार, हा बंद सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत असेल. यादरम्यान दुकानं, मॉल आणि संस्था बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. संयुक्त किसान मोर्चाने पंजाबमध्ये रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशारा दिला आहे. त्याशिवाय दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठाही रोखण्याची धमकी देण्यात आली आहे. (Bharat Bandh Today Live)
Punjab: Protestors block railway track in Amritsar as a mark of protest against the three agricultural laws during ‘Bharat Bandh’ called by Samyukt Kisan Morcha pic.twitter.com/dAZgfXa3yw
— ANI (@ANI) March 26, 2021
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टिकरी बॉर्डर, पंडित श्री राम शर्मा, बहादुरग़ सिटी आणि ब्रिगेडिअर होशियार सिंह मेट्रो स्टेशनचे एन्ट्री आणि एक्झिट गेट बंद असल्याची माहिती, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिली आहे.
कृषी कायद्याविरोधी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता जवळपास चार महिने पूर्ण झालेत. भारत बंदमध्ये अनेक लोकांचा , व्यापाऱ्यांचा, संस्थांचा आम्हाला सहकार्य मिळतंय. यामुळे सरकारला एक संदेश जाईल. सरकारशी संवाद साधण्याकरिता आम्ही 24 तास तयार आहोत, असं शेतकरी नेते राजवीर सिंह म्हणाले.
#WATCH A group of protesters sing and dance at Ghazipur border (Delhi-UP) during 12-hour ‘Bharat Bandh’ called by Samyukt Kisan Morcha against Centre’s Farm Laws pic.twitter.com/gkPWwKnTiP
— ANI (@ANI) March 26, 2021
मुंबई –
एनसीबीची मोठी कारवाई
मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर फारुख बटाटा याचा मुलगा शादाब बटाटा याला अटक
काल रात्री केली अटक
दोन कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त
लोखंडवाला , वर्सोवा आणि मीरा रोड येथे एनसीबीची कारवाई
पुणे –
– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या काही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर,
– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय,
– तसेच २५ एप्रिल रोजी विद्यापीठातर्फे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल,
– त्यानुसार विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ११ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे,
– शारीरिक शिक्षण पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ११ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत,
– विधी पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा १० ते १७ एप्रिल दरम्यान,
– शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या परीक्षा १० ते २० एप्रिल
– जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या विषयांच्या परीक्षा १० ते २५ एप्रिल या कालावधीत घेतल्या जाणार आहेत
भारत का इतिहास गवाह है कि सत्याग्रह से ही अत्याचार, अन्याय व अहंकार का अंत होता है।
आंदोलन देशहित में हो और शांतिपूर्ण हो!#आज_भारत_बंद_है
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 26, 2021
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून भारत बंदच्या पार्श्वभूमीवर गाजीपूर सीमा बंद, शेतकरी रस्त्यावर उतरले
Protesters block the Ghazipur border (Delhi-UP border) in view of 12-hour ‘Bharat Bandh’ call by Samyukt Kisan Morcha against Centre’s Farm Laws pic.twitter.com/JnmmPXixJd
— ANI (@ANI) March 26, 2021
शेतकऱ्यांच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली ते गाझियाबाद दरम्यानचा रस्ता बंद, गाझीपूर (दिल्ली-उत्तर प्रदेश) सीमेवर एनएच -24 दोन्ही बाजूंनी बंद