Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Covid-19 Vaccine: जून महिन्यापासून लहान मुलांवर कोव्हॅक्सिनची ट्रायल

सध्या कोव्हॅक्सिनचे उत्तम परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचत आहेत. | covaxin pediatric trail

Covid-19 Vaccine: जून महिन्यापासून लहान मुलांवर कोव्हॅक्सिनची ट्रायल
कोव्हॅक्सिन
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 9:01 AM

नवी दिल्ली: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा देशातील लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे, असा इशारा आतापर्यंत अनेक तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून लहान मुलांच्या संरक्षणासाठी विशेष पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जून महिन्यांपासून लहान मुलांवरील कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीच्या ट्रायलला सुरुवात होणार आहे. (Bharat Biotech may begin pediatric trail of covaxin from June)

भारत बायोटेकचे अधिकारी डॉ. राचेस एल्ला यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भातील संकेत दिले. आम्ही जून महिन्यापासून कोव्हॅक्सिनच्या पीडियाट्रिक ट्रायलला सुरुवात करत आहोत. त्यामुळे आगामी काही महिन्यांमध्ये जागतिक आरोग्य संघटना लहान मुलांवर कोव्हॅक्सिनचा वापर करण्यासाठी परवानगी देईल, अशी आशा डॉ. राचेस एल्ला यांनी व्यक्त केली.

सध्या कोव्हॅक्सिनचे उत्तम परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचत आहेत. आम्ही लवकरच लसीचे उत्पादन वाढवू. यंदाच्या वर्षाअखेरपर्यंत आम्ही 70 कोटी लसींचे उत्पादन करु, असा दावाही डॉ. राचेस एल्ला यांनी केला. केंद्र सरकारने भारत बायोटकेला 1500 कोटी रुपयांच्या कोरोना लशींची ऑर्डर दिली आहे.

नेझल व्हॅक्सिन ठरणार गेमचेंजर

जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथ यांनी भारतामध्ये तयार होत असलेली नेझल व्हॅक्सीन गेमचेंजर ठरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे लहान मुलांना लस देणे आणखी सोपे होईल. लहान मुलांच्या शाळा पुन्हा सुरु होईपर्यंत आपल्याला लवकरात लवकर लसीकरण करणे गरजेचे आहे. जेणेकरुन कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी होईल, असे सौम्या स्वामिनाथ यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

लहान मुलांसाठी नाकावाटे दिली जाणारी लस ठरणार ‘गेमचेंजर’; डब्ल्यूएचओच्या वैज्ञानिकांनी केला दावा

ब्लॅक फंगसचं रौद्ररुप, आतापर्यंत 7000 रुग्णांचा मृत्यू, AIIMS च्या संचालकांकडून अहवाल सादर

देशात शहरातील एक तृतीयांश लोक बाधित, पुण्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह; सीरो सर्व्हेचा दावा

(Bharat Biotech may begin pediatric trail of covaxin from June)

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.