3500 किलो मैदा, 600 किलो डाळ… रोज 10 हजार लोकांना जेवण; अशी आहे भारत जोडो यात्रा…

जहाज, हेलिकॉप्टर किंवा अन्य कोणत्याही वाहनातून जे शिकवलं जात नाही, शिकायला मिळत नाही ते या भारत जोडो यात्रेतून मला शिकायला मिळालं

3500 किलो मैदा, 600 किलो डाळ… रोज 10 हजार लोकांना जेवण; अशी आहे भारत जोडो यात्रा...
Follow us
| Updated on: Dec 05, 2022 | 10:47 PM

नवी दिल्लीः  काँग्रेसची भारत जोडो यात्रा रविवारी राजस्थानला पोहचली आहे. मध्य प्रदेशमधील रस्त्याने जात राजस्थानमध्ये पोहचलेली भारत जोडो यात्रा सोमवारी सकाळी झालवाडपासून पुन्हा सुरू झाली. काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेबरोबर शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांनी वाट चालत ठेवली आहे.

त्यामुळे या सर्व नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागत आहे. जेवणाच्या व्यवस्थेसह इतर व्यवस्था करण्यासाठी काँग्रेसने 45 ट्रकची व्यवस्था केली आहे.

हे सगळे ट्रक भारत जोडो यात्रेबरोबरच पुढे सरकत राहतात. या ट्रकमध्ये रेशन, पाणी, भाजीपाला आणि इतर साहित्याचाही भरणा असतो.

भारत जोडो यात्रेदरम्याने प्रत्येक दिवसाला जवळजवळ 10 हजार लोकांसाठी जेवण बनवले जाते. जेवणासाठी मसूर, भात, भाकरी आणि भाजीचाही समावेश असतो.

रोजचा मेन्यू हेच असेल असं काही सांगता येत नाही. मात्र रोज लोकांसाठी जेवणाची व्यवस्था मात्र केली जाते आहे. राजस्थानमध्ये पोहचलेल्या भारत जोडो यात्रेतील कार्यकर्त्यांना आता तेथील प्रसिद्ध जेवणही जेवता येणार आहे.

भारत जोडो यात्रेतील प्रवासबद्दल बोलताना राहुल गांधींनी सांगितले की, जहाज, हेलिकॉप्टर किंवा अन्य कोणत्याही वाहनातून जे शिकवलं जात नाही, शिकायला मिळत नाही ते या भारत जोडो यात्रेतून मला शिकायला मिळालं असंही त्यांनी सांगितले.

  1. भारत जोडो यात्रेदरम्यान रोज 10 हजार नागरिक नाष्टा आणि जेवण करतात. या सगळ्यांची व्यवस्था ही अगदी उच्चस्तरापासून केली जाते. जे रोजचे 10 हजार लोक आहेत त्यामध्ये यात्री, पाहुणे आणि सुरक्षा रक्षक, स्वयंसेवक यांचाही समावेश आहे.
  2. या यात्रेतील 10 हजार लोकांसाठी रोजचे जेवण बनवण्यासाठी भारत जोडो यात्रेत 35 क्विंटल मैदा, 600 किलो मसूर 40 क्विंटल भाजी आणि 80 हजार लिटर पाण्याची सोय करावी लागत असते. तर 6 हजार लिटर दूधाची व्यवस्था केली जाते.
  3. भारत जोडो यात्रेत जेवण बनवण्यासाठी 600 आचाऱ्यांची व्यवस्था केली गेली आहे. त्यामध्ये कॅटरर्सच्या 6 टीम काम करतात. या यात्रेत जेवणाची व्यवस्था नीट व्हावी यासाठी दोन फूड व्हॅनची सोय करण्यात आली आहे. पाणी, भाजीपाला आणि यात्रेबरोबर जाण्यासाठी 45 ट्रकची व्यवस्था केली गेली आहे.
  4. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे वरिष्ठ नेत्यांसाठी जेवण बनवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली गेली आहे. सुरक्षेच्या कारणामुले त्यांची स्वतंत्र व्यवस्था केली गेली आहे.
  5. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना स्नान करण्यासाठीही स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली गेली आहे. प्रत्येक व्यक्तीला स्नान करण्यासाठी या मूव्हिंग वॉशरूममध्ये सात मिनिटं लागतात.
  6. ज्या ठिकाणी भारत जोडो यात्रा थांबणार अशी शक्यता दिसू लागते तिथे सगळ्यात आधी त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाते.
  7. भारत जोडो यात्रेदरम्याने सकाळी सहा वाजता चहा, नाष्टा पोहचवला जातो. तर सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली जाते. तर सायंकाळी सहा ते सात वाजता रात्रीच्या जेवणाची सोय करून ठेवली जाते
  8. मध्य प्रदेशमधील बारा दिवसांच्या भारत जोडो यात्रेनंतर ही यात्रा आता राजस्थानमध्ये प्रवेश करत आहे. मध्य प्रदेशमध्ये ही यात्रा 380 किलो मीटरचे आंतर पार करणार आहे. मध्य प्रदेशमधील आगर माळवा जिल्ह्यातून रविवारी संध्याकाळी 6.40 च्या सुमारास चाळी नदीवरील पूल ओलांडून यात्रा राजस्थानमध्ये आता दाखल झाली आहे.
  9. कन्याकुमारी येथून 8 सप्टेंबर रोजी सुरू झालेली ही यात्रा प्रथमच काँग्रेसशासित राज्यात दाखल झाली आहे. 21 डिसेंबरला हरियाणात प्रवेश करण्यापूर्वी ही यात्रा झालावाड, कोटा, बुंदी, सवाई माधोपूर, दौसा आणि अलवर जिल्ह्यातून 17 दिवसांत 500 किमी अंतर कापणार आहे.
  10. राहुल गांधी यांनी सोमवारी सकाळी 6 वाजता काली तलाई येथून राजस्थान यात्रेला सुरुवात केली.14 किमीचे अंतर कापून ते सकाळी 10 वाजता बाली बोर्डा चौकात पोहोचतील. दुपारच्या जेवणानंतर हा प्रवास नाहर्डी येथून दुपारी 3.30 वाजता पुन्हा सुरू होईल आणि सायंकाळी 6.30 वाजता चंद्रभागा चौकात पोहोचेल. सायंकाळी चंद्रभागा चौकात काँग्रेस नेत्यांची नुक्कड सभा होणार आहे.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.