काय इतिहासाची पुनरावृत्ती होणार? सत्ता पालट करण्यासाठी काँग्रेसची खरी लढाई सुरु
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी त्या आपल्या आई सोनिया गांधींसोबत या यात्रेत सहभागी होणार की नाही याबाबत मात्र अद्याप स्षष्ट करण्यात आले नाही.
नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पुकारलेल्या भारत जोडो यात्रेला आता मोठे स्वरुप प्राप्त झाले आहे. काँग्रेसमधील अनेक नेते या यात्रेत सहभागी होत असतानाच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही (Congress President Sonia Gandhi) याता सहभागी 6 ऑक्टोबर रोजी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ हळूहळू जोर धरू लागली आहे.त्यामुळे आता 6 ऑक्टोबर रोजी सोनिया गांधींनी कर्नाटकातील ‘भारत जोडो यात्रे’ला (Bharat Jodo Yatra) उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले आहे.
मात्र, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी त्या आपल्या आई सोनिया गांधींसोबत या यात्रेत सहभागी होणार की नाही याबाबत मात्र अद्याप स्षष्ट करण्यात आले नाही.
भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रा सुरू केली होती.
गेल्या 30 सप्टेंबर पासून राहुल गांधी यांनी तामिळनाडू राज्यातील गुडलूरहून कर्नाटकातील गुंडलुपेट या ठिकाणी पोहचले होते.
भारत जोडो यात्रेचा हा प्रवास कर्नाटकात सुमारे 511 किमी अंतर कापणार आहे. आणि एकूण 21 दिवसात हे अंतर कापले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस नेत्यांकडूनही सांगण्यात आले आहे की, सोनिया गांधी 6 ऑक्टोबर रोजी कर्नाटकात जाणार असून त्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.
ही यात्रा सुरू झाल्यापासून सोनिया गांधी पहिल्यांदाच यामध्ये सहभागी होत आहेत. गेल्या काही दिववापूर्वी उपचारासाठी त्या परदेशात गेल्या होत्या. उपचार करुन परतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच या यात्रेत सहभागी होत आहेत.
काँग्रेससाठी कर्नाटकातील भारत जोडो यात्रेचा या राज्यातील हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण पुढील वर्षी येथील विधानसभेच्या निवडणुका होत असल्याने भाजपप्रणित असलेल्या राज्यातू ही यात्रा जात आहे.
नवीन वर्षाच्या प्रारंभीच राहुल गांधींनी काढलेली ही भारत जोडो यात्रा काश्मिरमध्ये थांबणार आहे. भारत जोडो या यात्रेचा हा प्रवास 3,570 किमी होणार आहे.