Bharat Jodo Yatra : कुत्र्यापासून गायीपर्यंत, लाल किल्ल्यावरील भाषणातील राहुल गांधी यांचे महत्त्वाचे मुद्दे

दोन-तीन अरबपतींसाठी २ ते ३ लाख कोटी रुपये सहज मिळतात, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

Bharat Jodo Yatra : कुत्र्यापासून गायीपर्यंत, लाल किल्ल्यावरील भाषणातील राहुल गांधी यांचे महत्त्वाचे मुद्दे
राहुल गांधी
| Updated on: Dec 24, 2022 | 9:12 PM

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान दिल्लीतील लाल किल्ल्यावरून लोकांना संबोधित केले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेले भारत जोडो यात्रा शनिवारी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पोहचली. यावेळी संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, हे सरकार नरेंद्र मोदी यांचे नाही. अंबानी आणि अदानी यांचे हे सरकार आहे. मी दोन हजार ८०० किलोमीटर फिरलो. पण, मला कुठंही हिंसा आढळली नाही. केंद्र सरकार तुमचं लक्ष इकडे तिकडे वळविण्याचा प्रयत्न करत आहे. खरे मुद्यांवरून लक्ष विचलीत करत आहे. देशात नफरत पसरवली जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी माझी प्रतिमा खराब करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. किती प्रतिमा खराब करू शकतात, हे मी पाहत होतो. मी एका महिन्याभरात देशासमोर त्यांची खरी बाजू उघड केली असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

देशात रोजगार शेतकरी आणि छोटे व्यापारी देत आहेत. कारण देशात असे लाखो लोकं आहेत. सामान्य माणसासाठी बँकांचे दरवाजे बंद असतात. पण, दोन-तीन अरबपतींसाठी २ ते ३ लाख कोटी रुपये सहज मिळतात, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

देशात चीननं आक्रमण केले नसल्याचं नरेंद्र मोदी म्हणतात. मग, २१ वेळा चीनसोबत चर्चा कशासाठी केली, असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला. चीननं भारताची दोन हजार किलोमीटर स्केअर जागा हडपल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
भारत जोडो यात्रेत कुत्रा, गाय आणि डुक्करही भेटले. पण, कुणावरही हल्ला केला असल्याचं राहुल गांधी म्हणाले.