Ayodhya Ram Mandir | एकाकाळ असा होता, लालकृष्ण आडवाणी राम जन्मभूमी आंदोलनाचा चेहरा होते. त्यांनी स्वत: आघाडीवर राहून नेतृत्व केलं. देशात भाजपाचा प्रचार, प्रसार झाला, त्यात लालकृष्ण आडवाणींच योगदान महत्त्वाच होतं. पण वाढत वय आणि बदलेली वेळ यामुळे लालकृष्ण आडवाणी हे नाव कुठेतरी मागे पडलय. राम जन्मभूमी आंदोलनात लालकृष्ण आडवाणींच योगदान विसरता येण्यासारख नाहीय. येणारी 22 जानेवारीची तारीख संबंध देशाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा दिवस आहे. अयोध्येत एक भव्य राम मंदिर उभ राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा होणार आहे. यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी पहिल्यांदाच व्यक्त झाले आहेत. “अयोध्येत राम मंदिराच उद्घाटन हे एका दैवी स्वप्नाच्या पूर्ततेसारख आहे. अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी नियतीने पंतप्रधान मोदींना निवडलय” असं लालकृष्ण आडवाणी म्हणाले.
‘राम मंदिर निर्माण, एक दिव्य स्वप्न की पुर्ती’ राष्ट्रधर्म नावाच्या एका मासिकात हा लेख प्रसिद्ध होणार आहे. 76 वर्ष जुन हे हिंदी मासिक आहे. त्यात आडवाणींनी म्हटलय की, ‘रथ यात्रेच्या संपूर्ण काळात नरेंद्र मोदी माझ्यासोबत होते’ “त्यावेळी ते फार प्रसिद्ध नव्हते. पण प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या भक्ताला म्हणजे मोदीला मंदिर पुनर्बांधणीसाठी निवडलय” असं आडवाणींनी म्हटल्याच वृत्त पीटीआयने दिलय.
आडवाणींनी काय प्रार्थना केलीय?
“एकदिवस अयोध्येत श्री रामांच भव्य मंदिर उभ राहणार हे नियतीने ठरवलं होतं. आता फक्त हा वेळेचा विषय आहे” असं आडवाणी म्हणाले. “प्राण प्रतिष्ठेचा सोहळा होईल, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील प्रत्येक नागरिकाच प्रतिनिधीत्व करतील” असही आडवाणी यांनी म्हटलय. “या मंदिरापासून सर्व देशवासियांनी प्रभू श्रीरामांचे गुण घेण्याची प्रेरणा मिळो, अशी मी प्रार्थना करेन” असं आडवाणी यांनी म्हटलय.
सोमनाथपासून सुरु झालेल्या यात्रेबद्दल आडवाणी काय म्हणाले?
राम जन्मभूमी मंदिराच्या बांधणीसाठी 33 वर्षांपूर्वी काढलेल्या ‘राम रथ यात्रे’चा उल्लेख त्यांनी केलाय. 25 सप्टेंबर 1990 रोजी गुजरातच्या सोमनाथ मंदिरापासून ही रथयात्रा सुरु झाली होती. “आज रथयात्रेला 33 वर्ष पूर्ण झाली. 25 सप्टेंबर 1990 च्या सकाळी राम रथ यात्रेला सुरुवात झाली. ही राम रथ यात्रा संपूर्ण देशात एक चळवळ बनेल याची आम्हाला तेव्हा कल्पना नव्हती” असं आडवाणींनी म्हटलय.