कर्मचाऱ्यांकडून 90 तास कामाची अपेक्षा ठेवणाऱ्या कंपन्यांना मोठा धक्का, व्यवस्थापनाचं टाळकं ठिकणावर आणणारा रिपोर्ट समोर
एल अँण्ड टीचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यम यांनी कामांच्या तासांबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, यातच आता एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे.
![कर्मचाऱ्यांकडून 90 तास कामाची अपेक्षा ठेवणाऱ्या कंपन्यांना मोठा धक्का, व्यवस्थापनाचं टाळकं ठिकणावर आणणारा रिपोर्ट समोर कर्मचाऱ्यांकडून 90 तास कामाची अपेक्षा ठेवणाऱ्या कंपन्यांना मोठा धक्का, व्यवस्थापनाचं टाळकं ठिकणावर आणणारा रिपोर्ट समोर](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/job-details.jpg?w=1280)
एल अँण्ड टीचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यम यांनी कामांच्या तासांबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, यातच आता एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे.सुब्रह्मण्यम यांच्या वक्तव्यानंतर नुकताच कर्मचाऱ्यांचा एक सर्व्हे करण्यात आला. हा सर्व्हे म्हणजे ज्या कंपन्यांना असं वाटतं की आपल्या कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करावं त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे. या सर्व्हेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी केवळ आपली इच्छाच व्यक्त केली नाही तर आपला फैसला देखील सुनावला आहे. हा सर्व्हे म्हणजे अशा सर्व कंपन्यांसाठी एक मोठी चपराक आहे.
जागतिक स्थरावर नोकऱ्यांबाबत माहिती देणाऱ्या एका वेबसाईटनं या संदर्भात कर्मचाऱ्यांचा एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे या सर्व्हेमध्ये जेवढे कर्मचारी सहभागी झाले होते. त्यातील 78 टक्के लोकांनी नोकरी आणि कुटुंब यामध्ये कुटुंबाला प्राथमिकता दिली आहे. यामध्ये सहभागी झालेल्या 78 टक्के लोकांनी असं म्हटलं आहे की आम्हाला नोकरीमध्ये मिळणाऱ्या प्रमोशनपेक्षा पत्नी, मुलंबाळ आणि आई-वडील यांचा आनंद अधिक महत्त्वाचा वाटतो. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या आरोग्यकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आम्ही अशा नोकरीच्या शोधात आहोत, जिथे आम्हाला चांगला पगारही मिळेल आणि आम्ही आयुष्याचा आनंद देखील घेऊ शकतो.
काम आणि कुटुंब यामध्ये संतुलन साधण्याची इच्छा
या सर्व्हेमधून अशी देखील एक गोष्ट समोर आली आहे, की कर्मचाऱ्यांना आपलं काम आणि कुटुंब यांच्यामध्ये योग्य ते संतुलनं साधलं गेलं पाहिजे अशी इच्छा आहे. या सर्व्हेमधील तब्बल 90 टक्के लोकांनी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याला प्राथमिकता दिली आहे. तसेच काही जणांनी म्हटलं आहे की नोकरीतून मिळणारं उत्पन्न चांगलं असावं, त्यातून आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करता यायला हव्यात. सोबतच कुटुंबाला देखील वेळ देता यावा. विशेष म्हणजे या सर्व्हेतील एकाही व्यक्तीनं 90 तास कामाचं समर्थन केलं नाही.