नितीश कुमारांचे 5 आमदार भाजपमध्ये…; मणिपूर विधानसभेत जनता दलाचे पानिपत; एनडीएची साथ सोडल्याचा परिणाम
मणिपूर विधानसभा निवडणुकीत 22 वर्षानंतर जनता दलाने आपले उमेदवार निवडूण आणले होते, 2000 साली विधानसभेच्या निवडणुकीत जनता दलाला एकाच जागेवर समाधान मानावे लागले होते, मात्र मणिपूरमध्ये होणाऱ्या अनेक निवडणुकीत मात्र एका जागेवर विजय मिळवणेही जनता दलाला शक्य झाले नाही.
नवी दिल्लीः मणिपुरमधील बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांच्या संयुक्त जनता दलातील (Janata Dal) 7 आमदारांपैकी 5 आमदार शुक्रवारी सत्तारूढ भाजपमध्ये (BJP) सामील झाले आहे. मणिपूर विधानसभेचे (Manipur VIdhan sabha) अध्यक्ष मेघजित सिंग यांच्या हस्ताक्षरातील एक पत्रकात म्हटले गेले आहे की, संयुक्त जनता दलातील पाच आमदारांनी भाजपमध्ये सामील होण्यास त्यांनी आपला होकार कळवला आहे. त्यामुळे पक्ष बदलणाऱ्या आमदारांची संख्या दोन तृतीयांश पेक्षा अधिक झाली असून त्यांच्या पक्षांतर बदलाला आता वैध मानले गेले आहे. यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत 38 जागांपैकी 6 जागांवर विजय मिळविला होता, त्यातील जनता दलातून भाजपमध्ये सामील होणारे जॉयकिशन, एन. सनाटे, मोहम्मद अचब उद्दीन, एल. एम. खौटे आणि थंगजाम अरुणकुमार यांचा समावेश आहे. खौटे आणि अरुण कुमार यांनी पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र पक्षाकडून तिकीट नाकारल्यानंतर संयुक्त जनता दलामध्ये त्यांनी प्रवेश केला होता.
जनता दलाला 22 वर्षानंतर यश मिळाले
मणिपूर विधानसभा निवडणुकीत 22 वर्षानंतर संयुक्त जनता दलाने आपले उमेदवार निवडून आणले होते, 2000 साली विधानसभेच्या निवडणुकीत संयुक्त जनता दलाला एकाच जागेवर समाधान मानावे लागले होते, मात्र मणिपूरमध्ये होणाऱ्या अनेक निवडणुकीत मात्र एका जागेवर विजय मिळवणेही संयुक्त जनता दलाला शक्य झाले नाही. तर 2017 मधील विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दलाकडून एकही जागा लढविली गेली नव्हती. विशेष म्हणजे राज्यातील भाजप सरकारपासून जेडीयू वेगळी झाल्याचे जाहीर होताच आमदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. तर पाटणा येथे 3 आणि 4 सप्टेंबर रोजी संयुक्त जनता दलाच्या आमदारांची बैठक होणार असून, त्या बैठकीत पाठिंबा काढून घेण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
नितीश कुमारांनी एनडीए सोडली
या वर्षाच्या प्रारंभीच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणि संयुक्त जनता दलाने मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढवली नव्हती. निवडणुकीच्या निकालानंतर मात्र जेडीयूच्या 7 आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला होता, त्यानंतर निवडणूक आयोगाकडूनही या महिन्याच्या प्रारंभीच मणिपूरमध्ये संयुक्त जनता दलाला राज्य पक्ष म्हणून मान्यता दिली होती. तर ऑगस्टमध्ये नितीश कुमार यांनी एनडीएची साथ सोडून आरजेडी आणि इतर पक्षांसोबत महाआघाडीचे सरकार स्थापन केले होते. बिहारच्या राजकारणातील हा बदल राष्ट्रीय राजकारणासाठी बदलाचे वारे असल्याचे बोलले जात आहे, 2024 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यासाठीच नितीश कुमारांनी एनडीएबरोबर फारकत घेतल्याचं बोललं जात आहे.