जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गुड न्यूज, गर्दीपासून होणार कायमची सुटका, मिळणार प्रत्येकाला सीट, रेल्वेचा मोठा निर्णय
येत्या डिसेंबरपासून रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.ज्या प्रवाशांना तिकीट मिळालं नाही असे प्रवासी रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करतात.
येत्या डिसेंबरपासून रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.ज्या प्रवाशांना तिकीट मिळालं नाही असे प्रवासी रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करतात. मात्र जनरल डब्यात प्रचंड गर्दी असते, गर्दीचा त्रास सहन करत उभ्यानं लाब पल्ल्याचा प्रवास करण्याची पाळी या प्रवाशांवर येते. मात्र आता अशा प्रवाशांसाठी गुड न्यूज आहे. रेल्वेकडून या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वेकडून एक विशेष योजना तयार करण्यात येत असून, जिची अंमलबजावणी येत्या डिसेंबरपासून होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर जनरल डब्यातील प्रवाशांची गर्दीपासून कायमची सुटका होणार आहे. ज्यांना ऐनवेळी तिकीट न मिळाल्यानं जनर डब्यातून प्रवास करावा लागतो अशा प्रवाशांसाठी आता रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे.रेल्वेने जनरल डब्याच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जनर डब्याची संख्या वाढल्यामुळे रेल्वेच्या या वर्गातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील आता सीट मिळणं शक्य होणार आहे, तसेच त्यांची गर्दीपासून कायमची सुटका होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जे प्रवासी रेल्वेच्या जनरल कोचमधून प्रवास करतात त्यांना अधिकाधिका सुविधा मिळाव्यात यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून आता लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये जनरल डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत देशभरातली तब्बल 370 रेल्वे गाड्यांच्या जनरल डब्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल एक हजार नव्या कोचची निर्मिती करण्यात आली आहे.त्यामुळे येत्या डिसेंबरपासून प्रवाशांची गर्दीपासून सुटका होणार आहे.
रेल्वे बोर्डाचे कार्यकारी निर्देशक दिलीप कुमार यांनी सांगितलं की जनर क्लासचे नवे कोच हे दोन फॅक्टरींमध्ये तयार करण्यात येत आहेत.चेन्नईमधील इंट्रीग्रल कोच आणि रायबरेलीमधल्या कोच फॅक्टरीमध्ये हे काम सुरू आहे. या योजनेंतर्गत तब्बल एक हजार नवे कोच तयार करण्यात येणार आहेत.