Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yogi Cabinet Meeting : पहिल्याच बैठकिमध्ये योगींचा मोठा निर्णय, मोफत रेशन योजनेला तीन महिन्यांची मुदतवाढ

आज शनिवारी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आपल्या नव्या मंत्रिमंडळासोबत बैठक घेतली. पहिल्याच बैठकीमध्ये त्यांनी कोरोना काळात सुरू केलेल्या मोफत धान्य योजनेला तीन महिन्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Yogi Cabinet Meeting : पहिल्याच बैठकिमध्ये योगींचा मोठा निर्णय, मोफत रेशन योजनेला तीन महिन्यांची मुदतवाढ
योगी आदित्यनाथ
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 12:28 PM

उत्तप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) पुन्हा एकदा योगी परवाला सुरुवात झाली आहे. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी शुक्रवारी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची (cm) शपथ घेतली. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच योगी आदित्यनाथ यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी आज शनिवारी आपल्या नव्या मंत्रिमंडळासोबत बैठक घेतली. पहिल्याच बैठकीमध्ये त्यांनी कोरोना काळात सुरू केलेल्या मोफत धान्य योजनेला तीन महिन्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री मंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर योगी आदित्य नाथ यांनी पत्रकारपरिषद घेतली या परिषकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी म्हटल आहे की, कोरोना काळात मोफत धान्य वाटप योजना सुरू करण्यात आली होती, या योजनेला आम्ही आणखी तीन महिन्यांसाठी वाढवत आहोत. या योजनेमुळे राज्यातील 15 कोटी लोकांचा फायदा होणार आहे. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे की, हा राज्य सरकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या निर्णयामुळे उत्तप्रदेशातील 15 कोटी लोकांचा फायदा होणार आहे. राज्यातील गरीब जनतेच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल आहे.

मंत्रिमंडळात समतोल साधण्याचा प्रयत्न

उत्तर प्रदेशमध्ये शनिवारी भाजपच्या योगी आदित्यानाथ यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. भाजपनं योगी आदित्यनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिलं. तर, मंत्रिमंडळ स्थापन करताना उत्तर प्रदेशचं जातीय गणित देखील बॅलन्स करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भाजपनं त्यांचा मूळ मतदार ठाकूर आणि ब्राह्मण समुदायासह भूमिहार,ओबीसी आणि एससी समुदायातील आमदारांना मंत्रिपद दिलं आहे. योगींच्या मंत्रिमंडळात 21 सवर्ण, 20 ओबीसी आणि एससी समुदायातील 9 मंत्र्यांचा समावेश आहे. योगी आदित्यानाथांशिवाय मंत्रिमंडळात 18 कॅबिनेट, 14 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि 20 राज्यमंत्री यांना राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी शपथ दिली. मुस्लीम आणि शीख समुदायातील प्रत्येकी एका एका सदस्याला मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.

ओबीसी समाजाला 20 मंत्रिपद

योगी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये ओबीसीच्या 20 आमदारांना मंत्री बनवण्यात आलं आहे. यामध्ये भाजपचे मित्र पक्ष अपना दल आणि निषाद पार्टीच्या एका आमदाराला संधी देण्यात आलीये. तर, त्यांना एक एक कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलंय. तर, भाजपचा ओबीसी चेहरा केशव प्रसाद मौर्य यांचा पराभव होऊन देखील उपमुख्यमंत्री करण्यात आलंय. तर, याशिवाय ओबीसींच्या इतर आठ आमदारांना मंत्री करण्यात आलंय. कुर्मी समाजाचे स्वतंत्र देव सिंह, राकेश सचान आणि अपना दलातून आशीष पटेल यांना मंत्रिपद मिळालंय. तर, जाट समुदायतून लक्ष्मी नारायण चौधरी आणि भूपेंद्र सिंह चौधरी यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलंय, याशिवाय राजभर समाजातून अनिल राजभर आणि निषाद पार्टीचे संजय निषाद आणि लोध समुदायतील धर्मपाल सिंह मंत्री बनले आहेत.

संबंधित बातम्या

प्रशांत किशोर काँग्रेससाठी काम करणार?, राहुल, प्रियंका गांधींची घेतली भेट, ‘mission gujarat’बाबत चर्चा काय?

युद्धानं तोडलं, प्रेमानं जोडलं ! दिल्ली विमानतळावर प्रपोज आणि युक्रेनची मुलगी बनली दिल्लीची सून

माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांची आज पुण्यतिथी; …म्हणून गोडघाटे यांनी ‘ग्रेस’ नावाने कविता लेखन केले

'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं.
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी.
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका.
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?.
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले.
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना.
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप.
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप.
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण.